डोंबिवली: ट्रेक क्षितीज संस्था, डोंबिवली तर्फे तीन दिवसीय ऐतिहासिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २१ जानेवारी या तीन दिवसांमध्ये वक्रतुंड सभागृह, श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत ते व्याख्यान संपन्न होणार आहे. संस्थेच्या माध्यमाने डोंबिवलीकरांनी आवर्जून यावे असे आवाहन करण्यात आले आहे.त्या तीन दिवसांमध्ये १९ जानेवारी, शुक्रवारी रोजी युद्धनिती शिवरायांची या विषयावर व्याख्याते आप्पा परब, २० जानेवारी, शनिवारी युद्धनिती - संभाजी महाराजांची या विषयावर व्याख्याते परिक्षित शेवडे, आणि २१ जानेवारी युद्धनिती - बाजीराव पेशव्यांची या विषयावर व्याख्याते कौस्तुभ कस्तुरे आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे. या तीनही दिवसांच्या व्याख्यानांसाठी प्रवेश विनामूल्य असेल असेही आयोजकांनी स्पष्ट केले.या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील विविध गड किल्लयांचे संवर्धन व्हावे यासाठी वर्षभर जनजागृती, प्रबोधन केले जाते. दिवाळीच्या सुट्यांमध्ये युवकांसह बालकांमध्ये गड किल्लयाविषयी आपुलकी, आकर्षण निर्माण व्हावे यासाठीही संस्थेच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात. त्यात विशेषकरुन किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या माध्यमाने अनेक वर्षे केले जाते. तसेच गडकिल्लयांच्या छायाचित्रांचे माहितीसह प्रदर्शन भरवणे,व्याख्यानााचे आयोजन आदी सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम साततत्याने केले जात असल्याचे संस्थेचे प्रतिनिधी कुशल देवळेकर यांनी सांगितले.
ट्रेक क्षितीज संस्था डोंबिवली तर्फे तीन दिवसीय ऐतिहासिक व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:20 AM
ट्रेक क्षितीज संस्था, डोंबिवली तर्फे तीन दिवसीय ऐतिहासिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २१ जानेवारी या तीन दिवसांमध्ये वक्रतुंड सभागृह, श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत ते व्याख्यान संपन्न होणार आहे.
ठळक मुद्देतीनही दिवसांच्या व्याख्यानांसाठी प्रवेश विनामूल्य वक्रतुंड सभागृह, श्री गणेश मंदिर संस्थान व्याख्यान संपन्न होणार संस्थेतर्फे महाराष्ट्रातील विविध गड किल्लयांचे संवर्धन व्हावे यासाठी वर्षभर जनजागृती