ठाणो : या आधी सुमारे दोन दिवस पुकारलेल्या संपाच्या समाप्तीसाठी सर्व मागण्या मंजूर करण्याचे आश्चवासन देऊनही त्यावर आजर्पयतही अंमलबजावणी झाली नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी संतापलेल्या राज्यभरातील दोन लाखांपेक्षा जास्त अंगणवाडी सेविका महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती सतिमीच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन 11 ते 13 फेब्रुवारी या तीन दिवशीय आंदोलन छेडणार आहे. या दरम्यान राज्यभर रास्ता रोकोसह जलभरो आदी विविध मार्गानी आंदोलन तीव्र करणार आहे.या आंदोलनामध्ये राज्यभरातील अंगणवाडी सेविकांच्या सुमारे सहा संघटना एकत्र येऊन त्यांनी कृती समिती गठीत केली आहे. या समितीच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या कालावधीत या सेविकांचे आंदोलन राज्यभर तीव्र करून शासनाला जाब विचारणार असल्याचे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी लोकमतला सांगितले. या कालावधीत जिल्हापातळीवर सेविका जेलभरो, रास्ता रोकोसह लोकशाही मार्गाने आंदोलन छेडून केंद्र व राज्य शासनास जाब विचारणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात सेविका रस्त्यावर उतरणार आहेत. तर ठाणोसह मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पालघर आदी जिल्ह्यातील सेविका आझाद मैदानावर मोर्चाव्दारे धडकणार आहे. ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष सेविकांची भेट घेऊन सर्व प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढणार नाही; तोर्पयत आंदोलन सुरू करण्याचा निर्धार करण्यात आल्याचे बृजपाल सिंह यांनी सांगितले.** आंदोलनकत्र्या सेविकाच्यां मागण्या -मध्यवर्ती सरकारच्या मानधन वाढीच्या अधिसूचनेची त्वरीत अंमलबजावणी, सेवा समाप्तीच्या लाभामध्ये तिपटीने वाढ, सेवा समाप्तीचा लाभ संबंधीत सेविकाना त्वरीत द्यावा. मानधन रकमेच्या अर्धी रक्कम पेन्शन म्हणून देणो, निकृष्ट टीएचआर त्वरीत बंद करून खाण्याच्या लायक टीएचआर देणो, अंब्रेला योजनेतील सुधारीत दर लागू करणो, टीएडीएची रक्कम देणो, मानधन फरकासह देणो, रजिस्टर-अहवाल फार्मची उपलब्ध करण, आजारपणासाठी एक महिना रजा, चांगले वजन काटे मिळावे, रिक्त जागी नियुक्ती, अतिरिक्त कामासाठी 5क् टक्के मानधन आदी मागण्या या आदोलन कत्या सेविकांकडून केल्या जात आहेत.
जाब विचारण्यासाठी राज्यभरातील सेविकांचे तीन दिवशीय रास्तारोको - जेलभरा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 7:47 PM
या आंदोलनामध्ये राज्यभरातील अंगणवाडी सेविकांच्या सुमारे सहा संघटना एकत्र येऊन त्यांनी कृती समिती गठीत केली आहे. या समितीच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या कालावधीत या सेविकांचे आंदोलन राज्यभर तीव्र करून शासनाला जाब विचारणार असल्याचे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी लोकमतला सांगितले.
ठळक मुद्देनिकृष्ट टीएचआर त्वरीत बंद करून खाण्याच्या लायक टीएचआरचांगले वजन काटे मिळावे, रिक्त जागी नियुक्तीजिल्हापातळीवर सेविका जेलभरो, रास्ता रोकोसह लोकशाही मार्गाने आंदोलन