बोईसर : तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नं एन ६० मधील स्क्वेअर केमिकल या कारखान्यात रविवारी विषारी वायुमुळे तीन जणांचा मृत्यू झाला, तर जखमींवर उपचार करणा-या डॉक्टरांनाही त्याची बाधा झाल्याने त्यांनाही अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आजूबाजूचे कारखाने रिकामे केले आहेत.रविवारी दुपारी ३.४५च्या दरम्यान कारखान्यातील आर एम २ या स्टोरेज टँकमध्ये सॉल्व्हंट भरण्याचे काम सुरू असताना, अचानक स्टोरेज टँक फाटून त्यामधून बाहेर सांडलेल्या रसायनातून निघालेला धूर व विषारी वायूची बाधा कारखान्याचे व्यवस्थापक प्रभाकर खडसे (५९), आॅपरेटर दत्तात्रय घुले (२५) व हेल्पर रघुनाथ गोराई (५०) यांना झाली,त्यात त्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेवेळी ४ हेल्पर कारखान्यात होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.इतर तिघांना एमआयडीसीतील तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांनाही जखमींच्या कपड्यांच्या वासाचा त्रास होऊ लागला. त्यामुळेत्यांनाही अतिदक्षता विभागात दाखलकेले आहे. संबंधित डॉक्टरांचीनावे सांगण्यास हॉस्पिटल प्रशासनानेनकार दिला.
तारापूर एमआयडीसीमध्ये विषारी वायुमुळे तिघांचा मृत्यू; उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही झाली बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 5:16 AM