शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

ठाण्यात टपरीचालकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:31 PM

गुटख्याची विक्री करणाऱ्या टपरी चालकाकडून दोन हजारांची खंडणी उकळल्याप्रकरणी कळवा (ठाणे) पोलिसांनी दीपक केशरी, निलेश फापाळे आणि सागर सोनवणे (२३) या तिघा कथित पत्रकारांना अटक केली आहे.

ठळक मुद्देपत्रकार असल्याची केली बतावणीकळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलदोन हजारांमध्ये केली ‘सेटींग’

ठाणे : खारेगावातील दीपक पटेल या टपरीचालकाकडून दोन हजारांची खंडणी उकळल्याप्रकरणी कळवा पोलिसांनी दीपक केशरी (२७), निलेश फापाळे (३०) आणि सागर सोनवणे (२३) या तिघा कथित पत्रकारांना अटक केली आहे. त्यांना ३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.पटेल याच्याकडे २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास एकाने गुटख्याची मागणी केली. त्याने तो दिल्यानंतर तिथे आलेल्या या तिघांनी ‘हम प्रेसवाले है, एफडीए में आपकी शिकायत करेंगे’, असे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्याला एका वाहनात बसवून हा सौदा केला. प्रकरण दोन हजारांवर ‘सेटल’ करण्यात आले. पटेलने त्याच्या एका मित्राला बोलवून हे पैसे त्यांना देऊन आपली सुटका करून घेतली. तोपर्यंत तिथे कुठली कारवाई सुरू आहे, हे पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली. त्यांच्यापैकीच एकाने कळवा पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक ईशाद सय्यद यांचे पथक गस्तीवर असताना त्यांनी गुटखा, खंडणीची दोन हजारांची रोकड आणि दोन लाखांच्या वाहनासह या तिघांना जेरबंद केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले. त्यांच्या आणखी तीन साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे. हे तिघेही पत्रकार असल्याच्या नावाखाली खंडणी उकळत होते. पण, ते नेमके कोणत्या वृत्तपत्रात काम करतात, हे स्पष्ट झाले नसल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले. अशाच प्रकारे कोणाची लूटमार झाली असेल, तर त्यांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावे. तसेच बंदी असलेला गुटखा बेकायदेशीरपणे विक्री करणाºया टपरीचालकांवरही कारवाई केली जाणार असल्याचे सय्यद यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी