- रवींद्र साळवेमोखाडा : मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर येथील गोठेघर पुलाजवळ लक्झरी आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात सरपंच महिलेसह तिघीजण जागीच ठार झाल्या तर ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमधील मयुरी वसंत पाटील या तालुक्यातील कोशिमशेत येथील रहिवासी असून धामणशेत कोशिमशेत या ग्रुप ग्रामपंचायतीच्या भाजपाच्या सरपंच आहेत. प्रमिला युवराज पाटील असे दुसर्या मृत महिलेचे नाव आहे. तसेच जखमी सुरेखा सुरेश पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाणे येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत होते. यावेळी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
लक्झरी बसमध्ये नवरी मुलीचे लग्नाचे वर्हाड असून मुलीकडचे नाशिककडून मुंबईकडे जात होते. तर मोखाडा तालुक्यातून बोलेरो गाडी लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी उल्हासनगर येथे चालली होती. पुढे जात असलेल्या बोलेरो गाडीच्या चालकाने अचानक ब्रेक मारल्याने भरधाव वेगाने मागून येणाऱ्या लक्झरी बसने बोलेरो गाडीला जोरदार धडक दिली. अशी अपघाताबाबत प्राथमिक माहिती आहे. अपघातात बोलेरो गाडीमधील चालकासह ८ जण गंभीर जखमी झाले असून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. सर्व जखमी असून त्यांना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लक्झरी-बोलेरो अपघातातील जखमींची नावे :
- भास्कर जनार्दन कोरडे (वय - ४९)
- अश्विनी युवराज पाटील (वय - २०)
- युवराज शंकर पाटील ( वय ४५)
- कमल पांडुरंग फाळके (वय ५२)
- रोशन युवराज पाटील (वय २८)