ठाणे : मांडूळाची तस्करी करून ठाणे शहरात आणल्या जात असल्याची खबर मिळताच वनविभागाने साफळा रचून रविवारी खारीगांव येथे दुपारी २ वाजता तस्करी करणा-या दोन आरोपींसह दोन मांडूळ हस्तगत केले. यातील तिस-या आरोपीलाही जेरबंद करून आज ताब्यात घेण्यात आले. पोलिसांसह वन अधिकाऱ्यांव्दारे या संदर्भात कसून चौकशी सुरू आहे. परदेशात कोठ्यवधी रूपयांच्या किंमतीत विकण्यासाठी या मांडूळाची तस्करी करण्यात आली. मांडूळाची तस्करी करण्याच्या उद्देशान या दोन मांडूळाना ठाणे शहरात आणण्यात आले होते. गाडीतून या दोन मांडूळाना कोकणातून आणण्यात आले. वन विभागाच्या पथकाने मांडूळासह दोन आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या दोन आरोपीच्या सांगण्यावरून रायगड जिल्ह्यातील सुधाकर पाली येऊन एक आरोपी पकडण्यात यश मिळाले. या परिसरातील आदिवासी व्यक्तीने पकडलेल्या मांडळाना या आरोपींनी तस्करी करण्याच्या उद्देशाने घेतले. ठाणे शहरात येण्या आधीच त्यांना खारीगांव येथील महामार्गावर रविवारी ताब्यात घेऊन वन विभागाने कारवाई सुरू केली आहे. या संदर्भात अधिक काही माहिती मिळवण्याच्या दृष्टीने कारवाई सुरू असल्याचे वनाधिकारी व या घटनेचे तपास अधिकारी दिलीप देशमुख यांनी लोकमतला सांगितले.