शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

तीन महिन्यांत २0१४ जणांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:58 PM

अकरा महिन्यात ३ हजार ९०३ जणांना श्वानदंश

ठाणे:भटक्या श्वानांची दहशत काय असते, हे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. या वर्षातील अकरा महिन्यांत तीन हजार ९०३ जणांनी श्वानदंशावर उपचार घेतले असून त्यामध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत तब्बल दोन हजार १४ जणांना श्वानदंश झाल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील शहरी भागाप्रमाणे आता ग्रामीण भागातही झपाट्याने नागरीकीकरण होत आहे. जिल्ह्याच्या या वाढत्या विस्ताराबरोबरच जागोजागी निर्माण होणाऱ्या घाणीच्या व कचºयाच्या साम्राज्यामुळे तसेच चायनीज गाड्यांमुळे भटक्या कुत्र्यांची समस्या शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील वाढू लागली आहे. हे श्वान मोटारसायकलने ये- जा करणाºयांचा पाठलाग करणे, लोकांच्या अंगावर न भुंकणे, लोकांचे लचके तोडणे यासारख्या घटना दिवसेंदिवस वाढ आहेत. नुकतेच उल्हासनगर येथे एकाच वेळी सात मुलांना भटक्या श्वानांनी चावे घेतले होते. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ येणाºया रुग्णांची माहिती घेतली असता, ही धक्कादायक बाब पुढे आली. मागील चार वर्षांत सुमारे १२ हजार जणांना श्वानदंश झाला आहे. २०१५ मध्ये दोन हजार ५६९ जण उपचारार्थ दाखल झाले होते, तर २०१६ मध्ये २,१९६ जण उपचारार्थ आले होते. २०१७ मध्ये हा आकडा थेट १ हजार १०० वर पोहोचला. श्वानदंश झाल्यानंतर त्यावर देण्यात येणार इंजेक्शन अथवा व्हॅक्सीनचा साठा सहा महिने पुरेल इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पालघर जिल्ह्यात श्वानदंश झालेले रु ग्णही उपचारसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात येतात. त्यामुळे जिल्हा रु ग्णालयावरील ताण मात्र जिल्हा विभाजनानंतरही कमी झाल्याचे अजून दिसत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.चिंतेचा विषय : श्वानदंशाच्या वाढत्या घटना हा चिंतेचा विषय झाला आहे. २०१८ च्या जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यात ३ हजार ९०३ नागरिकांना भटक्या श्वानांनी चावे घेतले. ही आकडेवारी या प्रकाराचे गांभीर्य स्पष्ट करते.श्वानदंशाबाबत शासकीय रु ग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. येथे उपचारार्थ येणाºयांवर तातडीने उपचार केले जातात.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा सामान्य रु ग्णालय ठाणेआकडेवारीमहिना           श्वानदंशजानेवारी          ३०६फेब्रुवारी          २६७मार्च                २४७एप्रिल              २७५मे                    २१६जून                 २३९जुलै                 १७१ऑगस्ट            १६८सप्टेंबर             ३९६ऑक्टोबर        ६९६नोव्हेंबर           ९२२डिसेंबर            ०००एकूण             ३९०३

टॅग्स :dogकुत्राMedicalवैद्यकीयHealthआरोग्यthaneठाणे