ठाणे : जिल्ह्यात गेल्या वर्षी आक्टोबर अखेरपर्यंत सरासरी दोन हजार ४५० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. पण या सरासरी पेक्षा यंदा तीन महिने आधीच म्हणजे आजपर्यंत सरासरी दोन हजार ८८७.३३ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यावरून जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत तीन महिने आधीच सरासरी ४३७.३२ मिमी. जास्त पाऊस आजपर्यंत जिल्ह्यात पडला आहे.जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला. आज केवळ ११३ मिमी. म्हणजे सरासरी १६.१४ पाऊस पडला. पण जिल्ह्यात आजपर्यंत एकूण दोन हजार २११.३२ मिमी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सरासरी दोन हजार ८८७.३३ मिमी. पाऊस पडला. गेल्या वर्षाच्या एकूण पावसापेक्षा जास्त पाऊस तीन महिने आधीच जिल्ह्यात पडल्याचे उघड झाले आहे. ११७.८५ टक्के पाऊस जिल्ह्यात पडला आहे. गेल्या वर्षी शेवटपर्यंत म्हणजे ३१ आक्टोबरपर्यंत १७ हजार १५०.१० मिमी. पाऊस पडला होता. सरासरी दोन हजार ४५० मिमी नोंद करण्यात आली होती. या एकूण पावसापेक्षा जास्त पाऊस तीन महिने आधीच जिल्ह्यात पडला. आजून तीन महिने पडणाऱ्या पावसाचा विचार करता काही वर्षांच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस पडल्याची नोंद होणार आहे.
तीन महिने आधीच ठाणे जिल्ह्यात सरासरी ४३७ मिमी. जास्त पाऊस
By सुरेश लोखंडे | Published: August 11, 2019 6:20 PM
जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला. आज केवळ ११३ मिमी. म्हणजे सरासरी १६.१४ पाऊस पडला. पण जिल्ह्यात आजपर्यंत एकूण दोन हजार २११.३२ मिमी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सरासरी दोन हजार ८८७.३३ मिमी. पाऊस पडला. गेल्या वर्षाच्या एकूण पावसापेक्षा जास्त पाऊस तीन महिने आधीच जिल्ह्यात पडल्याचे उघड झाले
ठळक मुद्देआजपर्यंत सरासरी दोन हजार ८८७.३३ मिमी पाऊस तीन महिने आधीच सरासरी ४३७.३२ मिमी. जास्त