बदलापूर : बदलापूर पालिका क्षेत्रात सोमवारी आणखी तीन नवीन रुग्ण आढळले आहेत. हे तिन्ही रुग्ण मुंबईत कामाला असून तेथेच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. या तीन पैकी दोन रुग्ण हे मुंबई महापालिकेतील कर्मचारी आहेत तर एक रुग्ण खाजगी कंपनीचा कर्मचारी आहे. हे तिघे बदलापूरहून बसने मुंबईला प्रवास करीत असल्याने चिंता आणखीन वाढली आहे.बदलापूरमध्ये सोमवारी सापडलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण बदलापूर गावातील, एक रुग्ण बेलवली आणि एक रुग्ण मानव पार्क परिसरातील आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील त्यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर हे तिघे ज्या बसमधून प्रवास करत होते, त्यातील कर्मचाऱ्यांनाही धोका निर्माण झाला आहे. बदलापूरमधून सुटणारी बस आणि मुंबईतून येणाºया बस यामुळे कर्मचाऱ्यांसोबत कोरोनाचाही प्रवास सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. बदलापूरमधून दररोज दोन हजारांहून अधिक कर्मचारी मुंबई आणि परिसरात जात आहेत. आतापर्यंत बदलापूरमध्ये सापडलेल्या रुग्णांपैकी ९० रुग्ण हे मुंबईत काम करणारे कर्मचारी आणि त्याचे कुटुंबीय आहेत. यामुळे आता मुंबईत काम करणाºयांची स्वतंत्र सोय करण्याची गरज व्यक्त होत आहे.>अंबरनाथमध्येही सापडला रुग्णअंबरनाथमध्ये राहणाºया आणि भाभा रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारी असणाºया महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ती ताज हॉटेलमध्ये राहत होती. रुग्णालयातच तिला लागण झाल्याची शक्यता आहे. नवरे पार्क परिसरात ही महिला राहत असून तिच्या घरच्यांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. अंबरनाथमध्ये सापडलेला हा सहावा रुग्ण आहे. यापैकी एकाचा मृत्यू तर तीन जणांची कोरोनातून सुटका झाली आहे. उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत.
बदलापूरमध्ये सापडले कोरोनाचे तीन नवीन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 1:52 AM