ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करून रुग्ण बरे होण्याची संख्याही आता वाढू लागली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी मानली जात आहे. ठाण्यात आतापर्यंत तब्बल १२ कोरोना बाधीत रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तर तिकडे कल्याण डोंबिवलीतही १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ठाणे जिल्ह्यात मागील २४ तासात १७ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ठाण्यात बुधवारी नवीन १४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ही २७२ एवढी झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून मोठ्याप्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहे. आता त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसू लागले आहे. परंतु,दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्यात मंगळवारी एका दिवसात १७ नवीन कोरोनाबाधित रु ग्णांची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी ही २५१ वरून आता २७२ वर पोहोचली असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी नवीन १४ रुग्ण आढळले असून येथील रु ग्णांची संख्या १०१वर पोहोचली आहे.गेल्या काही दिवसात ठाण्यात कोरोनाबाधीतांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. सोमवारी ३० रुग्णांची भर पडल्यानंतर मंगळवारी त्यात आणखी सात जणांची भर पडली तर बुधवारी यामध्ये १४ रुग्ण वाढल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. परंतु, असे असले तरी ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे एकीकडे कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे कोरोनावर मात करून ठाणे शहरात १२ रुग्ण हे ठणठणीत बरे झाले असून कल्याण डोंबिवलीतीला बाधीत रुग्णांची संख्या ही ५७ एवढी असून त्यातील २ रुग्ण मयत झाले आहेत. तर आतापर्यंत १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते बरे झालेले आहेत.डोंबिवलीत २ नवे रुग्णदरम्यान ठाणे शहरात आजघडीला ९५ जणांना याची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. तर १२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एका नव्या रु ग्णांची नोंद झाली आहे. तेथील रु ग्णाच्या आकडा ५२ वर पोहोचला असून डोंबिवलीत दोन रुग्ण आढळले आहेत. येथील आकडा ५७ झाला आहे. तर अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी मिरा-भार्इंदर, ठाणे ग्रामीण या भागात एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही.