मुंबई/डोंबिवली : कळवा रेल्वे स्थानकादरम्यान मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली होती. धिम्या मार्गावरील या घटनेने दिवसभर वाहतुकीचा खेळखंडोबा झाला.त्याआधी सकाळपासूनच कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक अर्ध्या तासाच्या विलंबाने धावत होती. त्याचा फटका दुपारच्या सत्रात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला. त्यामुळे धिम्या मार्गावरील प्रवाशांना त्याचा जास्त फटका बसला.सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा ३० ते ४० मिनिटांनी उशिराने चालविण्यात येत होत्या. अनेक लोकल रद्द करण्यात आल्या. कळवा मार्गावर काही काळ दिवापर्यंत लोकल उभ्या होत्या. त्यामुळे दुपारच्या वेळेत डोंबिवली, दिवा, कल्याण तसेच अन्य स्थानकांत प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यामुळे दीड ते चार या वेळेत मुंबई दिशेकडे जाणाºया लोकलमध्ये गर्दी झाली होती. त्यानंतर दुपारी ३ च्या सुमारास सिग्नल यंत्रणा पूर्ववत झाली. पण त्या १५ मिनिटांत वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडल्याने संध्याकाळपर्यंत लोकलचा वेग मंदावला होता.मध्य रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन दुरुस्तीचे काम केले, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. कळवादरम्यान दुपारी अर्धा तास सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे लोकलसेवेवर परिणाम झाला होता, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंग यांनी दिली.>मेगाब्लॉक घेऊनही रडगाणे सुरूचप्रत्येक रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो. या वेळी सिग्नल यंत्रणा, रेल्वे मार्ग, ओव्हर हेड वायर यांची दुरुस्ती आणि देखभाल केली जाते. मात्र तरीदेखील मेगाब्लॉकच्या दुसºया आणि तिसºया दिवशी रेल्वे मार्गात तांत्रिक अडचणी येत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
सिग्नल यंत्रणेत बिघाडाने रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 5:58 AM