ठाणे : प्लास्टिक बाळगणाºया बेकरीचालकावर कारवाई न करण्यासाठी लाच स्वीकारताना ठाणे महापालिकेचे पर्यवेक्षक संजय मगर, भारत सोनवणे आणि शाहीर खेंगले या तिघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे रेल्वेस्थानक रोडवरील एका बेकरीचालकाला ठाणे महापालिकेच्या या तीन कर्मचाºयांनी प्लास्टिकवर कारवाई न करण्यासाठी १७ डिसेंबर रोजी पाच हजारांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी या बेकरीचालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तिघांना अटक केली.
महावितरणच्या सहायक अभियंत्यासही अटककोपरी येथील एका गाळ्यामध्ये विद्युतमीटर देण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारणाºया वीज वितरण कंपनीचा सहायक अभियंता सचिन शेडगे याला बुधवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. आनंदनगर चेकनाका येथील एका दुकानात नवीन वीजमीटरची जोडणी करण्यासाठी महावितरणच्या कोपरी उपविभागाचे सहायक अभियंता शेडगे यांच्याकडे या गाळ्याचा मालक पाठपुरावा करीत होता. अखेर, त्याने २० हजारांमध्ये नवीन जोडणी करून देण्याचे मान्य केले. त्यापोटी १२ हजारांची रक्कम त्याने आधीच स्वीकारली. त्यानंतर, उर्वरित आठ हजारांची रक्कम स्वीकारताना आरोपीला अटक करण्यात आली.