कल्याण : लिफ्ट मध्ये तब्बल २ तास अडकलेल्या तीन चीमुरड्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी लिफ्टचा दरवाजा तोडून सुखरूप सुटका केल्याची घटना कल्याण पश्चिमेकडील गांधीचौक परिसरातील खेडा अव्हेन्यू इमारतीच्या तिसर्या मजल्यावर घडली. मुलाना सुखरूप पाहून आईवडिलाचा जीव भांड्यात पडला. पालकांनी अग्निशमन दलाच्या जवानाचे आभार मानले.
मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कल्याणातील गांधी चौक परिसरातील खेडा अव्हेन्यू इमारतीमधील रहिवासी असलेल्या जैन कुटुंबातील तीन भावंडे (१२ वर्षाचा मुलगा, ८ वर्षाचा मुलगा आणि ४ वर्षाची मुलगी) लिफ्टमधून खाली उतरत असताना हि लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर अडकली. लिफ्ट बंद पडल्यामुळे घाबरलेल्या मुलांनी लिफ्टमधील मदतीसाठीचे बटन वाजवून रहिवाशांना सूचना दिली मात्र इमर्जन्सी चावी आणि लिफ्ट टेक्निशियन कडूनही लिफ्ट उघडत नसल्यामुळे अखेर रहिवाशांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. प्रयत्न करूनही लिफ्ट उघडत नसल्यामुळे अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी हायड्रोलिक कटर स्प्रेडरच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा कापून काढत आत अडकलेल्या चिमुरड्यची सुखरूप सुटका केली. तब्बल दोन तास लिफ्टमध्ये अडकल्याने घाबरलेल्या मुलांनी लिफ्ट बाहेर पडताच पालकांकडे धाव घेतली तर पालकांनी आपल्या मुलाची सुखरूप सुटका केल्यामुळे अग्निशमन कर्मचार्याचे आभार मानले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा
पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले
थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला
Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही