ठाणे : श्री गणेश क्लचरल अकॅडेमी या संस्थेतर्फे डॉ. सितारा देवी या नर्तन कट्टयात डॉ. पल्लवी नाईक यांनी भरतनाट्यम नृत्य प्रस्तुती केली. नाद, ताल, लय, स्वर या अमूर्त व मूर्त शक्तींना त्यांनी नृत्यातून अभिवादन केले. गुरू स्मिता महाजन यांनी लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या मराठी रचनांची निवड नृत्याभिवादन ह्या कार्यक्रमासाठी केली होती.
शास्त्रीय नृत्य हि प्रयोगशील कला, या कलेचे सादरीकरण हा येथील सर्वात रंजक अनुभव. ठाण्यातील कलाकारांना सादरीकरणाचा आनंद मिळावा व समाजात या कलांबद्दलची जाणीव वाढावी या हेतूने गुरु डॉ. मंजिरी देव यांनी श्री गणेश क्लचरल अकॅडेमी या त्यांचा संस्थेतर्फे डॉ. सितारा देवी नर्तन कट्टा या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात केली. गेली तीन वर्ष हा उपक्रम सातत्याने प्रत्यके महिन्याच्या तिसऱ्या रविवारी गडकरी रंगायतनच्या स्वागतकक्षेच्या जागेत संपन्न होत आहे. समाजाभिमुख अशा ह्या उपक्रमात गायन, वादन व नर्तन या कलांचे सदिरीकरण सकाळी ६.३० ते ७.३० या वेळात होते. स्वाभाविकच पाहट पासून तयारी करून कलाकार सकाळी सादरीकरण करतो यात त्याची कलेवरील निष्ठा हि दिसून येते. मराठी रचनांच्या प्रस्तुतीमुळे रसिक प्रेक्षकांना त्यांचे सादरीकरण अधिक भावले. कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच गणेश स्तुतीने केले गेली. या रचनेत गजमुख, शस्त्र व पुष्प धरलेला, शूर्पकर्ण, मूषकवाहन, एकदंत, मोदकाधारी असा गणपती, वरदविनायक, त्रिशूलधारी, लंबोदर, पाशांकुशधार असा गणांचा नायक, बुद्धी प्रदायक, सर्वांना सुखी आनंदी ठेवणारा शंकर पार्वतीचा सुपुत्र गणपती याची सुंदर रूपे रेखाटली. या नंतर मल्लरी हि शुद्ध नर्तनाची रचना सदार करण्यात आली. हे सादरीकरण सौन्दर्यपूर्ण रेषा व ताल बद्ध पदन्यासांनी युक्त होते. संगीताची थोरवी सांगणारी पुढील रचना संगीत शब्दम. हि रचना व त्याची सौंरचना नाविन्यपूर्ण वाटली. आपल्या आजूबाजूला असलेल्या सत् शक्तीची जाणीव करून देणारी मूर्त म्हणू कि अमूर्त तू या रचनेने सादरीकरणाचा उचांक गाठला. रसिकांकडून आस्वाद्याचे दान मागून, गुरूंच्या कृपेने कलाभ्यास उन्नत होवो व उपस्थितांचे मंगळ चिंतून नृत्याभिवाद ह्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पल्लवी यांच्या सहज व श्रवणीय निवेदनाने रसिकांना प्रस्तुत रचनांचा अधिक आनंद घेता आला.