ठाणे : गेल्या काही दिवसांत शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एकाच दिवशी तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या घटनांप्रकरणी राबोडी, वर्तकनगर आणि कासारवडवली पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद केले आहेत. ठाण्यातील होलीक्रॉस शाळेजवळ राहणारे ३७वर्षीय इसमाच्या हातातील मोबाइल फोन चोरून चोरट्यांनी पळ काढला. तसेच राबोडी कत्तलखाना येथे राहणारे ३१वर्षीय इसमाच्या घरातून १ लाख ६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. तर, धोबीआळी येथे राहणारे नेहल छेडा (३९) यांच्या कासारवडवली येथील मिठाईच्या दुकानाचे लॉक तोडून ६० हजार ७०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. तसेच तुळशीधाम येथे राहणारे ३७वर्षीय इसम हॉटेलमध्ये गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची २५ हजार किमतीची दुचाकी गाडी चोरून नेली.
ठाण्यात चोरट्यांचा धुमाकूळ
By admin | Published: December 22, 2015 2:10 AM