लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अंडरवर्ल्डचे लोक तिहार जेलमध्ये बसून संवाद साधत धमक्या देत असतील तर हा प्रश्न राज्याशी मर्यादित राहत नाही. तर तो राष्ट्रव्यापी होतो. त्यामुळे याचे उत्तर मोदी सरकारला द्यावे लागेल. कारण तिहार जेल मोदी सरकारच्या आखत्यारीत आहे. त्यामुळे तिहार जेल अंडरवर्ल्डचे मोठे हेडक्वॉर्टर झाले आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरु वारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे.ठाणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना तिहार जेलमधून कथित धमकी आली. त्यासंदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने सावंत यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. हे निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गँगस्टार हे केवळ धमक्या देण्यापूरते नाही तर ते आता अनधिकृत बांधकामांना संरक्षणही देत आहेत. प्रशासन आणि अंडरवर्ल्ड यांच्या संगनमताने हे रॅकेट सुरु असल्याचा आरोप करून हे सर्व दिल्लीमधून होत असेल तर यापेक्षा गंभीर कुठलीही बाब असू शकत नाही. त्यामुळे भाजपला याचे उत्तर देणे क्र मप्राप्त झाले आहे. प्रशासकीय अधिकारी आणि अंडरवर्ल्ड यांचे काय संबंध आहे. त्याची मुळे किती खोल गेली आहेत. याचा शोध घेऊन ती वेळीच उखडून काढणे गरजेचे असल्याचे ही त्यांनी सांगितले. गुन्हेगारांना शासन करण्याची भाषा करणारे मोदी सरकार आणि भाजप नेते आता त्यांना संरक्षण देण्याचे काम करीत आहे, असा आरोपही सावंत यांनी केला.या संदर्भात काँग्रेस पक्षाने दाखल घेतली असून त्याची तक्र ार करणे गरजेचे आहे. याप्रकरणी गुन्हा ही दाखल झाला पाहीजे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे, शहराध्यक्ष विक्र ांत चव्हाण, इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा शहर मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे आदी उपस्थित होते.
तिहार जेल झाले अंडरवर्ल्डचे मोठे हेडक्वाटर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 12:40 AM
ठाणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना तिहार जेलमधून कथित धमकी आली. त्यासंदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने सावंत यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. हे निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गँगस्टार हे केवळ धमक्या देण्यापूरते नाही तर ते आता अनधिकृत बांधकामांना संरक्षणही देत आहेत.
ठळक मुद्दे काँग्रेस प्रवक्ते सचीन सावंत यांचा आरोपविक्रांत चव्हाण यांना आलेल्या धमकी प्रकरणी घेतली पोलीस आयुक्तांची भेट