कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील प्रसिद्ध लक्ष्मी मार्केटमधील व्यापा:यांना त्याची दुकाने उघडण्याची परवानगी अद्याप दिलेली नाही. त्यामुळे 700 भाजी व फळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली. लक्ष्मी मार्केट सुरु करण्याची परवानगी महापालिका प्रशासनाकडे मागितली होती. अद्याप परवनगी दिलेली नाही. अन्य दुकाने उघडण्याची परवानगी दिली जात आहे. मात्र लक्ष्मी मार्केटमधील व्यापा:यावर अन्याय का असा संतप्त सवाल उपासमार होत असलेल्या व्यापारी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.
24 मार्च रोजी देशात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहिर झाला. तेव्हापासून लक्ष्मी मार्केट बंद आहे. मार्केट तीन महिने बंद आहे. त्यामुळे व्यापा:यावर उपासमारीची वेळ आली आहे. बाजार समितीत भाजीपाला विक्रीला परवानगी आहे. त्याचबरोबर शहरात किरकोळ विक्रीकरीता परवानगी दिली आहे. शहरातील अन्य भाजीपाला विक्रीची दुकाने सुरु आहेत. जूनमध्ये सम विषय तारखेला दुकाने सुरु करण्यात आली. अनलॉक वनमध्ये बहुतांश व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला. इतकेच काय शेजारी असलेल्या झुंझारराव मार्केटमधील अन्यधान्यांची दुकानेही उघडी करण्यास परवानगी दिली गेली. मात्र लक्ष्मी मार्केटवरील बंदी कायम आहे. आठवडा भरापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक रवी पाटील यांच्यासह भाजी मार्केटचे पदाधिकारी रफीक तांबोळी व मोहन नाईक यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यांना एक निवेदन सादर केले.त्यानंतर आयुक्तांनी स्वत: मार्केटची पाहणी केली. पाहणी केल्यानंतरही मार्केट सुरु करण्याची परवानगी मिळाली नाही. व्यापारी परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत. मार्केटमध्ये सोसल डिस्टसींग पाळले जाणार नाही यामुळे परवानगी देणो टाळले जात असेल तर अन्य ठिकाणी सोशल डिस्टसिंगचे कितपत पालन होते असा संतप्त सवाल व्यापा:यांनी केला आहे.