शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
2
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
3
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
4
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
7
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
8
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
14
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
16
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
18
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
19
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
20
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

तांत्रिक अडचणींमुळे लता मंगेशकर नाट्यगृहातील पहिला प्रयोग पुढे ढकलण्याची वेळ

By धीरज परब | Published: November 13, 2022 10:15 PM

नव्याने सदर नाट्यगृह इमारत उभारताना नाट्य क्षेत्रातील काही प्रमुख मंडळींना पाचारण करण्यात आले होते.

मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील पहिल्या नाट्यगृहातील नाटकाचा पहिला प्रयोग हा ध्वनी आणि विद्युत व्यवस्थे मधील त्रुटीं मुळे पुढे ढकलण्याची पाळी निर्मात्यांवर आली आहे . त्यामुळे पालिकेने या प्रकरणी संबंधितांची बैठक मंगळवारी आयोजित करून तांत्रिक अडचणी दूर करण्या बाबत प्रयत्न केले जाणार आहे . आलिशान व सुंदर अश्या लता मंगेशकर नाट्यगृहातील नाटकाची पहिलीच घंटा न वाजल्याने नाट्यप्रेमींमध्ये नाराजी आहे . 

काशीमीरा महामार्गावर असलेल्या आलिशान लता मंगेशकर नाट्यगृहाच्या इमारतीचे उदघाटन नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते . त्या नंतर सदर नाट्यगृह चालवण्यासाठी पालिका प्रशासना कडून धोरण निश्चित करण्याचे काम केले जात होते. दरम्यान मध्यंतरी स्व . शांताराम नांदगावकर यांच्या कवितांचा कार्यक्रम सदर नाट्यगृहात सादर करण्यात आला होता . त्याशिवाय वारकरी भवन, मराठा भवन आदी वस्तूंच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम सुद्धा याच नाट्यगृहात झाले . यावेळी ध्वनी यंत्रणेत काही अडचणी समोर आल्या होत्या. 

दरम्यान मीरारोड मध्येच राहणारे तसेच पालिकेचे स्वच्छता दूत असलेले अभिनेते गिरीश ओक यांच्या ३८ कृष्ण वीला ह्या नाटकाचा प्रयोग रविवार १३ नोव्हेम्बर रोजी लावण्यात आला होता . स्वतः ओक यांनीच सदर नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग सुरु न झाल्याने पुढाकार घेऊन नाट्यगृहातील पहिला प्रयोग घेतला होता . त्या नाटकाच्या तांत्रिक विभागाच्या पथकाने नाट्यगृहाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व महत्वाच्या अश्या ध्वनी यंत्रणा व विद्युत यंत्रणेचा आढावा घेतला होता . त्यावेळी त्यांना तांत्रिक त्रुटी आढळून आल्या होत्या . ध्वनी यंत्रणा आणि विद्युत यंत्रणा हा नाटकातील महत्वाचा भाग असल्याने मंगेशकर नाट्यगृहातील त्रुटी पाहता अखेर सदर नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागला. 

नव्याने सदर नाट्यगृह इमारत उभारताना नाट्य क्षेत्रातील काही प्रमुख मंडळींना पाचारण करण्यात आले होते . त्यावेळी त्यांनी केलेली पाहणी आणि दिलेल्या सूचनां नुसार काम करण्यात आले होते . मात्र त्या नंतर देखील ध्वनी , लाईट व्यवस्थेत त्रुटी आढळून आल्याने त्या सोडवण्यासाठी उपायुक्त रवी पवार व संबंधित यांची मंगळवारी बैठक होणार आहे . स्वतः पवार यांनी त्यास दुजोरा दिला आहे. तर राज्यातील अनेक नव्याने बांधलेल्या नाट्यगृहाच्या इमारतीं मध्ये काहीं काही त्रुटी आढळून आल्या होत्या . पण नंतर त्या दूर करून नाटकांचे प्रयोग सुरळीत चालत असल्याचा अनुभव नाट्य क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केला . 

लता मंगेशकर नाट्यगृह हे अतिशय छान आहे . मी मीरारोडचा रहिवासी असल्याने नाटकाचे प्रयोग सुरु व्हावे यासाठी सदर नाटक आयोजित केले होते . परंतु काही तांत्रिक त्रुटीं मुळे सदर नाटकाचा प्रयोग पुढे ढकलण्यात आला याचे दुःख आहे . लवकरच त्या तांत्रिक त्रुटी दूर व्हाव्यात यासाठी त्यातील तज्ञांशी पालिकेचा संपर्क करून दिला आहे . तांत्रीक त्रुटी दूर होताच नाटकाचा प्रयोग सादर केला जाईल - डॉ . गिरीश ओक ( अभिनेते )