लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून त्यानुसार आता अतिधोकादायक इमारती रिकाम्या करुन तोडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. असे असतांनाच आता शहरातील ३० वर्षे जुन्या असलेल्या १२४ इमारतींना तत्काळ स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे फर्मान ठाणे महापालिकेच्या वतीने काढण्यात आले आहे. त्यामुळे या इमारतीत राहणा:या रहिवाशांनी धावपळ सुरु झाली आहे. त्यातही ज्यांना इमारतींचे ऑडीट करायचे असेल त्यांनी महापालिकेच्या पॅनवरील ऑडीटर कडून ते करु न घेऊ शकतात असे आवाहन करीत त्यांची यादी देखील पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी दरवर्षी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा यादी जाहीर केली जात आहे. त्यानुसार यंदा ४५५६ इमारती धोकादायक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यातील ७३ इमारती या अतिधोकादायक असून त्या इमारती खाली करुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार आतार्पयत ३० इमारतींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. परंतु आता यापुढेही जाऊन शहरातील ३० वर्षे जुन्या असलेल्या इमारतींना देखील पालिकेने नोटीसा बजावल्या असून या नोटीसीद्वारे संबधींत इमारत धारकांना स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संबधींतानी तत्काळ ऑडीट करुन घ्यावे आणि त्याचा अहवाल महापालिकेस सादर करावे अशा सुचनाही पालिकेने दिल्या आहेत. ३० वर्षे इमारती रहिवास वापरासाठी योग्य आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी पालिकेने अशाप्रकारचे आदेश दिले आहेत. ठाणो महापालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्यांमार्फतच इमारतींचे ऑडीट करून घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या अभियंत्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो पालिकेला सादर करण्याच्या सुचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणा:या इमारतींना २५ हजार रु पये किंवा वार्षिक मालमत्ता कर यापैकी जी जास्त रक्कम असेल, तितका दंड आकारण्याची अधिनियमात तरतुद असल्याचे प्रशासनाने नोटीसमध्ये नमुद केले आहे. त्यामुळे इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या आदेशाकडे कानाडोळा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची टांगती तलवार आली आहे.