शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

टीएमटी कर्मचाऱ्यांना मिळणार शिवभोजन थाळीचा आस्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 1:16 AM

अर्थसंकल्पात आश्वासन : ठाण्यात सुरू होणार रिंगरूट सेवा

ठाणे : ठाणे परिवहन समितीच्या माध्यमातून परिवहन सेवेचे ४३८.८६ कोटींचे अंदाजपत्रक परिवहन समितीचे माजी सभापती राजेंद्र महाडिक यांनी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांना सादर केले. यामध्ये कामगारांसाठी शिवभोजन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, कामगारांसाठी प्रगती योजना, रिंगरूटची सेवा सुरू करावी, अशा महत्त्वाच्या सूचना या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.

या अर्थसंकल्पात दिव्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी दिवा रेल्वे स्टेशनजवळ सेवा सुरू करून दिवा ते डोंबिवली, दिवा-वाशी आणि दिवा-पनवेल ही सेवा सुरू करावी, परिवहन सेवेकडे जीसीसीच्या १९० बस आहेत; परंतु परिवहनच्या स्वत:च्या ताफ्यातील बसची संख्या कमी होत आहे.

परिवहनच्या स्वत:च्या बसची संख्या नव्याने ५० बस घेण्यात याव्यात, परिवहन सेवेतील कामगारांना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत रक्कम वेळेत मिळावी, परिवहन सेवेत १२ व २४ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाºयांना महापालिकेच्या धर्तीवर आश्वासित प्रगती योजना लागू करण्याकरिता वाढीव सहा कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.

याशिवाय परिवहन सेवेतील चारही बस आगारांमध्ये कर्मचाºयांना शिवभोजन योजनेद्वारे अल्पदरात जेवणाची थाळी उपलब्ध करून द्यावी, परिवहन सेवेकडे जास्तीत जास्त प्रवासीवर्ग यावा, यासाठी परतावा तिकीट योजना सुरू करावी, तर ठाणे पूर्व भागात ठाणे स्टेशन ते कोपरीगाव या मार्गावर मिडीबस सुरू करावी, अशा काही सूचना केल्या आहेत.पालिकेने अनुदानात केली वाढ : गेल्या वर्षी परिवहनमार्फत ३५० कोटींचे अनुदान पालिकेकडे मागितले होते. मात्र, पालिकेने १३० कोटी दिले होते. त्यामुळेच यंदा परिवहनने २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात महसुली कामात १५६.१० कोटी, सवलतीपोटी ३३ कोटी ४१ लाख, संचलन तुटीपोटी १०१ कोटी ५३ लाख, अशी एकूण २९१ कोटींच्या अनुदानाची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने सादर केलेल्या आपल्या मूळ अंदाजपत्रकात १५८.६२ कोटींचे अनुदान प्रस्तावित केले आहे.

टॅग्स :tmcठाणे महापालिका