ठाणे : स्टेशन ते जांभळीनाका या भागात रस्त्यांवर बसणा-या भाजीविक्रेत्यांचा अडथळा टीएमटीच्या बसेसला होत असून त्यासाठी ठाणे परिवहन प्रशासन आणि परिवहनच्या समिती सदस्यांनी शनिवारी पहाटे अतिक्रमण विभागाच्या मदतीने कारवाई केली होती.रविवारी मात्र दुपारनंतर या भागात भाजीविक्रेत्यांबरोबरच फेरीवाल्यांनी दोन्ही बाजूंनी रस्ता अडवला. त्यामुळे स्टेशन ते जांभळीनाक्यापर्यंत टीएमटी बसेसच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या कारवाईबाबत पुन्हा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.संबंधित रस्त्याचे रुंदीकरण केल्यानंतर येथील फेरीवाल्यांना हटवण्याची मोहीम जोरात राबवली होती; तरीदेखील येथे फेरीवाल्यांचे वास्तव्य होते. त्यामुळे आळीपाळीने विविध अधिकारी आणि एस्ट्रा फोर्स घेऊन येथे कारवाई सुरू असूनही या मार्गावरील फेरीवाल्यांची संख्या कमी झालेली नाही. या फेरीवाल्यांचा आता टीएमटीच्या बसेसलादेखील अडथळा निर्माण होऊ लागला आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर या बाजारपेठमार्गातून परिवहनच्या बसेस धावू लागल्या आहेत. परंतु, फेरीवाल्यांचा आणि आता पहाटे या बाजारपेठेत बसणाºया भाजीविक्रेत्यांचा फटका परिवहनच्या बसेसला बसत असल्याची माहिती समोर आली आहे.पहाटे ४ ते सकाळी ९ वाजेपर्यंत या मार्गावर शहरातील छोटे विक्रेते भाजीखरेदीसाठी येत असल्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे या मार्गावरून स्थानकाच्या दिशेने जाणाºया बसेसला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांनादेखील याचा फटका बसत आहे.भाजीखरेदी करणाºया ग्राहकांना बसचा धक्का लागून अपघात होण्याची भीतीही व्यक्त होते. काँग्रेसचे परिवहन सदस्य सचिन शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करत ठरावीक वेळेत बस पूर्वीच्या मार्गाने वळवण्याची मागणी केली; मात्र बसचा मार्ग वळवल्यास प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती.दरम्यान, या मागणीच्या पार्श्वभूमीवर परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी, सभापती अनिल भोर, सदस्य सचिन शिंदे आणि राजेंद्र महाडिक यांनी शनिवारी पहाटे बाजारपेठ मार्गाची पाहणी केली. त्यानंतर, बसचा विनाअडथळा आणि अपघातमुक्त प्रवास व्हावा, यासाठी पालिकेच्या अतिक्र मण पथकाची मदत घेण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला. बाजारपेठ मार्गावर पहाटे ते सकाळपर्यंत भाजीविक्रेते बसत असल्यामुळे या काळात येथे अतिक्र मण पथकाचे एक वाहन ठेवायचे आणि भाजीविक्रेत्यांचा बसच्या वाहतुकीला अडथळा होणार नाही, याकडे पथकाने लक्ष द्याायचे, अशी योजना प्रशासनाकडून आखली जात असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.>अवघ्या तीन मिनिटांसाठी १५ ते २० मिनिटेकारवाई होऊनही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रविवारी फेरीवाले बसल्याचे दिसून आले. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांच्या बाहेर दुचाकींची पार्किंग झाली होती. त्यामुळे जांभळीनाका ते स्टेशनपर्यंतच्या अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरासाठी टीएमटीच्या बसेसला तब्बल १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागत होता. त्यामुळे पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करतो की, या फेरीवाल्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला.
बाजारपेठेत टीएमटीची अडथळ्यांची शर्यत!, भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:52 AM