शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

टीएमटीला जाहिरातीतून मिळणार १४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:34 AM

ठाणे परिवहन सेवेने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी इतर स्रोतांकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार, आता टीएमटीच्या ताफ्यातील ५८८ पैकी सद्य:स्थितीत सुरू

ठाणे : ठाणे परिवहन सेवेने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी इतर स्रोतांकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार, आता टीएमटीच्या ताफ्यातील ५८८ पैकी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या ४३४ बसवर यापुढे जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. यातून ३६ महिन्यांत म्हणजेच तीन वर्षांत १३ कोटी ७२ लाख ४४ हजार ७८० रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.ठाणे परिवहन सेवेचे २०१८-१९ चे अंदाजपत्रक नुकतेच सादर केले आहे. यामध्ये कोणत्याही स्वरूपाची भाडेवाढ न करता प्रवाशांना चकाचक प्रवासाची हमी प्रथमच देण्यात आली आहे. त्यानुसार, भविष्यात ठाणेकरांना ६०० च्या आपसास बस उपलब्ध होणार आहेत. आज ठाणे महापालिकेची परिस्थिती चांगली असल्याने त्यांच्या अनुदानातून परिवहनचा गाडा बºयापैकी हाकला जात आहे. परंतु, भविष्यात पालिकेने अनुदान देणेच बंद केले, तर तो हाकायचा कसा, असा प्रश्न उपस्थित झाल्याने परिवहन प्रशासनाने आपले उत्पन्न इतर स्रोतांच्या माध्यमातून वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यानुसार, जाहिराती प्रसिद्ध करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या परिवहनच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये सध्या असलेल्या बस आणि भविष्यात सामील होणाºया बसचादेखील समावेश केला आहे. त्यानुसार, प्रतिबस महिनाकाठी परिवहनला सहा हजार ४३४ रुपये प्राप्त होणार आहेत. तर, व्होल्वो बसचे दर हे ३१ हजार ५०० इतके निश्चित केले आहे. त्यानुसार, ३६ महिन्यांत म्हणजेच तीन वर्षांत १३ कोटी ७२ लाख ४४ हजार ७८० रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे.