ठाणे: गेल्या काही दिवसांपासून मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुक कोंडी होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या हाेत्या. याची गांभीयार्ने दखल घेत वाहतूक कोंडीची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी ठाणे ग्रामीणचे पाेलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पाेलिस उपायुक्त विनयकुमार राठाेड यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्तपणे पाहणी करुन अनेक ठिकाणचे दुभाजक बंद केल्याची माहिती ठाणे शहर पाेलिसांनी दिली.देशमाने आणि राठोड यांनी मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते वडपे नाका या सुमारे २० किलाे मीटर महामार्गाची १६ जुलै राेजी पाहणी केली. या पाहणीत महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांमधील रस्ता दुभाजकावर (डिव्हायडर) अनेक ठिकाणी विभागलेला हाेता. या रिकाम्या जागेतून काही वाहन चालक त्यांची वाहने एका वाहिनीवरून दुसऱ्या वाहिनीवर ने-आण करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी हाेत हाेते. रस्त्याच्यामधील रिकाम्या जागा बंद केल्यास वाहतुक कोडी होणार नसल्याचे या पाहणीत निदर्शनास आल्याने महामार्गावरील खारेगाव टोलनाका, सरवली गाव ते वडपे गाव ता. भिवडी या ठाणे ग्राणीण कार्यक्षेत्रातील महामार्गावरील माेकळया ठिकाणी पूर्णतः तर काही ठिकाणी अंशतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाणे आयुक्तालय कार्यक्षेत्रातील महामार्गावरील आर. सी. पाटील कट/ िदवे अंजूर गाव पुर्णतः बंद , दिवे अंजूर पेटोलपपाच्या पुढील कट फक्त लहान वाहनांसाठी सुरु ठेवण्यात आला. तर अरुणकुमार क्वारी कट (मानकोली ब्रिज ) पुर्णत: बंद केला. मोठी वाहने राजनोली ब्रिज खाली यूटर्न मारुन जातील.अशी आहेत गॅप बंद केलेली ठिकाणे -साई ढाबाच गौरव पेट्रोलपंप, आदर्श पेट्रोलपंप, बी.एम.सी पाईप लाईन, टेपाचा पाडा, वालशिद जुना रस्ता, वृंदावन कॉम्प्लेक्स, सत्यम पेट्रोलपंप, इंडस्ट्रीयल लॉजेस्टिक, रिलायन्स पेट्रोलपंप, आदर्श पेट्रोलपंप, याठिकाणावरुन मोठया प्रमाणात वाहने यु-टर्न करून घेउन वाहतूक करतात. तसेच शेवाया ढाबा, शामियाना ढाबा आदी ठिकाणावरील अनाधिकृत दुभाजकांवर सिमेंटचे ब्लॉक लावून ते पूर्णतः बंद केले आहेत.
कमी उंचीच्या दुभाजकांचा चालक घेतात फायदा-महामार्गावरील दोन्ही वाहिन्यांमधील दुभाजक कमी उंचीचे असल्याने काही वाहन चालक एका वाहीनीवरून दुसया वाहिनीवर वाहने क्रॉसिंग करतात. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडते. त्यासाठी दुभाजकावर सलगरित्या मोठे सिमेंट ब्लॉक बसवण्यातबाबत एमएसआरडीसीला यावेळी सूचविण्यात आले.