ठाणे : शहरात दुरुस्तीची कामे, यात्रा आणि फेस्टिव्हलनिमित्त १२ ते १५ जानेवारीदरम्यान वाहतुकीत बदल केला आहे. ठाणे महापालिकेतर्फे संत नामदेव चौक (टेलिफोननाका) येथे उड्डाणपुलाच्या कामामुळे एम.जी. रोडवर गोडबोले हॉस्पिटलसमोर मलनि:सारण पाइपलाइन तुटल्याने दुरु स्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे टेलिफोननाक्याकडून कोपरी पुलाकडे जाणाऱ्या वाहनांना ज्युपिटर स्कॅन सेंटरसमोर बंदी घातल्याने ती उजव्या बाजूस वळून सरस्वती हायस्कूल, भास्कर कॉलनी, स्वामी विवेकानंद रोडने पराडकर हॉस्पिटलमार्गे पुढे जातील. तसेच हा मार्ग एकदिशा वाहतुकीसाठी खुला राहणार असून बस व ट्रक, टेम्पो अशी वाहने टेलिफोननाक्यावरून सरळ तीनहातनाक्यावरून हाय वे मार्गे पुढे जातील. कोपरी ब्रिजकडून टेलिफोननाक्याकडे येणाऱ्या वाहनांना कोपरी पूल सर्कलला प्रवेशबंदी घातल्याने ही वाहने हाय वे मार्गे जातील. ही अधिसूचना १३ पासून १५ जानेवारी या काळात अमलात राहील, असे वाहतूक पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ठाण्यात आजपासून वाहतुकीत बदल
By admin | Published: January 12, 2017 7:02 AM