शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भिवंडी-शीळ मार्गावर टोल, सहापदरी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 6:43 AM

भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तो सहापदरी करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजुरी दिली आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तो सहापदरी करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजुरी दिली आहे. त्यासाठी १.७५ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. ती संपादित झाली की प्रकल्पाच्या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. या कामावर सुमारे ३९० कोटी खर्च होणार असून तो वसूल करण्यासाठी या रस्त्यावर २०३६ सालापर्यंत टोल द्यावा लागणार आहे. राज्यातील सर्व टोल बंद करण्याची घोषमा करणाºया भाजपा-शिवसेना सरकारनेच या नव्या टोलचा प्रस्ताव मांडला आहे, हे याचे वैशिष्ट्य आहे.भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे, कल्याण-निर्मल-नांदेड या महामार्गांना जोडणारा आहे. पायाभूत सुविधांतर्गत सरकारने २००६ साली या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेतला आणि राज्य रस्ते विकास महामंडळाने खाजगी कंत्राटदाराकडून तो विकसित केला. ते काम २००९ ला पूर्ण झाले. भिवंडी-कल्याण-शीळ प्लस या कंपनीला त्याच्या टोलवसुलीचे काम देण्यात आले. त्या कंपनीने २००९ पासून २०१३ पर्यंत टोलवसुली केली. आताही तेथे अवजड वाहनांकडून काटई आणि कोन येथे टोलवसुली सुरु आहे. चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच टोलवसुली झाल्याने हे प्रकरण उच्च न्यायालायात गेले होते. ही टोलवसुली बंद करण्यासाठी २००९ साली आमदार रवींद्र चव्हाण यांनी उपोषण केले होते.वाढती वाहतूक लक्षात घेता तो सहा पदरी करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हा रस्ता २१ किमीचा आहे. त्याच्या सहापदरीकरणावर ३८९ कोटी ६३ लाखाचा खर्च होणार आहे. त्यासाठी २०१७-१८ मध्ये ४५ कोटी, २०१८-१९ मध्ये ६० कोटी, २०१९-२० मध्ये ४५ कोटीची रक्कम देण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०१४ सालच्या टोलवसुली धोरणातून या प्रकल्पाला सूट देत २०१६ पर्यंत या रस्त्यावर टोलवसुली होणार आहे.रस्त्यासाठी भूसंपादन झाले की, निविदा काढली जाईल. ती मंजूर झाल्यावर कार्यादेश देत तीन वर्षात रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तीन वर्षाचा बांधकाम कालावधी पाहता रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीच्या पाच टक्के खर्चासाठी नऊ कोटी ८१ लाख बांधकामाच्या किंमतीत समाविष्ट केले आहेत. प्रकल्पात बाधित होणाºयांच्या पुनर्वसनासाठी नऊ कोटी ८० लाखांची, भूसंपादनासाठी ९० कोटीची आणि टोलनाके उभारणीसाठी २५ कोटीची तरतूद याच खर्चात केली आहे.या सहापदरीकरणासाठी एक हजार ४० झाडे तोडावी लागणार आहेत. त्यासाठी रस्ते विकास महामंडळाने केडीएमसीकडे परवानगी मागितली आहे. त्यावर पालिकेने हरकती सूचना मागवल्या आहेत. पण निर्णय झालेला नाही.असा होईल खर्चसहा पदरीकरणासाठी-७७ कोटी ७२ लाखदेसाई खाडी पूल- तीन कोटी ३७ लाखचार लहान पूल- तीन कोटी २७ लाखलोढा जंक्शन दोन पदरी उड्डाणपूल-३४ कोटी ३२ लाखकाटई रेल्वे मार्गावर दोन पदरी पूल -९ कोटी ९ लाखपत्रीपूल भागात दोन पूल-४ कोटी ६५ लाख१८ मोºया - १ कोटी ५४ लाखजंक्शन सुधारणा- ९ कोटी ८४ लाखसेवा रस्ते- ३ कोटी ४ लाखबस शेल्टर- ७८ लाखसल्लागार खर्च- ३ कोटी ९२ लाखएजन्सी चार्जेस- ११ कोटी ७७ लाखरस्ते सुरक्षा खर्च- ४९ लाखसेवा वाहिन्या हलविण्यासाठी- ४ कोटी १० लाखपर्यावरण बाबींसाठी- ३ कोटी १६ लाखदेखभाल-दुरुस्तीसाठी - नऊ कोटी ८१ लाखपुनर्वसनासाठी - नऊ कोटी ८० लाखभूसंपादन - ९० कोटीटोलनाके उभारणी - २५ कोटीचौपदरीकरणाचा दुसरा टप्पा गायबभिवंडी-कल्याण-शीळ या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यावर २६३ कोटी खर्च झाले. त्याचा दुसरा टप्पा २६८ कोटीचा असेल, असे जाहीर केले होते. त्याच्या भूसंपादनाची प्रक्रियाही सुरु होती. नंतर दुसºया टप्प्याची फाईल गायब झाली. आता सहा पदरीकरण होणार आहे आणि त्याला शासन निर्णयात पहिला टप्पा असे म्हटले आहे.

टॅग्स :highwayमहामार्गbhiwandiभिवंडीkalyanकल्याण