ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-पुणे आणि कोल्हापूर टोलनाक्यांवर टोल भरावा लागणार नाही. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने त्यासाठी शनिवारपासून टोल फ्री पासचे वाटप सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी ठाण्यातील २२० चाकरमान्यांना या पासचे वाटप झाल्याची माहिती आरटीओने दिली. ९ सप्टेंबर रोजी रविवार असल्याचे गर्दी होण्याची शक्यता आहे.कोकणात जाणाºया हलक्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार, या टोलमाफीसाठी आरटीओ आणि पोलीस स्टेशनमधून स्टिकर घ्यावे लागणार आहेत.तसेच ठाण्यात आरटीओमार्फत टोल फ्री पाससाठी कोकणात जाणाºयांना गाडीचे इन्शुरन्स पेपर, आरसी बुक, पीयूसी, वाहनचालकाचा दूरध्वनी क्र मांक, प्रवास करणाºया प्रवाशांची नावे, गावाला जाण्याचा मार्ग आदींची माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतरच, चाकरमान्यांना हा पास मिळणार आहे.>उपप्रादेशिक केंद्रे सुरूया पासच्या वाटपासाठी ठाणे आरटीओ विभागाने चारही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह मुख्य कार्यालयात वाटप केंद्र सुरू केले आहे. त्या कार्यालयात सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे वाटप सुरू राहणार आहे. यामध्ये जाणे-येणे असा पास दिला जाणार आहे.शनिवारी सुट्टी असल्याने पहिल्याच दिवशी मर्फी या कार्यालयातून १९०, तर मध्यवर्ती जेल कारागृहासमोरील आरटीओ कार्यालय येथून ३० अशा २२० चाकरमान्यांनी पास घेतले आहेत, तसेच प्रत्येक कार्यालयात एक हजार अर्ज दिल्याची माहिती ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली.
कोकणात जाण्यासाठी टोल फ्री पासवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 5:25 AM