शहरं
Join us  
Trending Stories
1
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
2
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
3
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
4
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
6
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
8
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
9
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
10
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
11
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
12
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
13
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
14
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
16
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
17
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
18
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
19
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
20
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर

प्रदूषणाचा विषय फोरमच्या गळ्यात

By admin | Published: August 18, 2016 5:12 AM

रासायनिक कारखान्यातून होणारे प्रदूषण आणि धोकादायक कारखान्यांवर कारवाई करायची असेल तर पाहणी करून रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांची यादी सिटीझन

डोंबिवली : रासायनिक कारखान्यातून होणारे प्रदूषण आणि धोकादायक कारखान्यांवर कारवाई करायची असेल तर पाहणी करून रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांची यादी सिटीझन फोरम फॉर पोल्यूशन फ्री डोंबिवली या संस्थेने सादर करावी. त्यांच्या अहवालानंतर या कारखान्यांवर कारवाई केली जाईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. त्यामुळे या कारखान्यांचा विषय मांडणाऱ्या व त्यासाठी झगडणाऱ्या संस्थेच्याच गळ््यात हा विषय पडला आहे.हे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ कुचकामी ठरल्याने मुख्यमंत्र्यांनी त्याची जबाबदारी एमआयडीसीच्या गळ््यात टाकली होती. ती आता या संस्थेच्या गळ््यात पडली आहे. फोरमने सर्वेक्षण करुन प्रदूषण करणारे कारखाने व धोकादायक कारखान्यांची यादी सादर करावी. त्यानुसार संबंधित कारखान्यांविरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी फोरमच्या शिष्टमंडळाला दिले. फोरमला विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. फोरमतर्फे अश्वीन अघोर, राजू नलावडे, माधव जोशी, अजित अभ्यंकर आणि अनिल त्रिवेदी यांनी देसाई यांची भेट घेतली. प्रदूषण रोखण्यात नियंत्रण मंडळ अपयशी ठरले आहे. एमआयडीसीही त्याला तितकीच जबाबदार आहे. प्रोबेस कंपनीतील स्फोटामुळे धोकादायक कारखान्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. नियमांचे उल्लंघन करुन कारखानदारांनी उभारलेल्या बॉयलरचा विषय एमआयडीसीकडे मांडूनही त्यांनी काही केले नसल्याकडे त्यांनी उद्योगमंत्र्यांचे लक्ष वेधले. औद्योगिक सुरक्षा विभाग आणि आरोग्य संचालनालयाने नलावडे यांना माहितीच्या अधिकारात पाच धोकादायक कारखान्यांची माहिती दिली. मात्र कारवाईच न झाल्याने शहराचा धोका कमी झालेला नाही, हे लक्षात आल्यावर फोरमने प्रदूषणकारी व धोकादायक कारखान्यांचे सर्वेक्षण करुन त्याची यादी उद्योग मंत्रालयाला सादर करावी. त्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देसाई यांनी दिले. (प्रतिनिधी)नेमके काय घडले?सांडपाणी प्रक्रियेचा विषय हरीत लवादाकडे आहे. लवादाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला दणका दिल्याने त्यांनी डोंबिवली आणि अंबरनाथमधील १४२ कारखाने बंद करण्याची नोटीस दिली आहे. त्यावर दाद मागूनही अद्याप लवादाने कारखानदारांना दिलासा दिलेला नाही. त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. तोवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखानाबंदी उठवली. त्यामुळे प्रदूषणानाने त्रस्त असलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.