ठाणे : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी ठाणे शहरातील कार्यकर्त्यांसह भूमिपुत्रांनी क्रांतिदिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. ९) रात्री उशिरा मशाल रॅली काढून राज्य शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधले.
जिल्ह्यातील बहुतांश सर्व गावागावांत संघटितरीत्या मशाल रॅली काढून नवी मुंबई विमानतळाला पाटील यांचेच नाव लागले पाहिजे, अशी मागणी लावून धरली. ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन करून ही रॅली जांभळी नाकामार्गे तलावपाळी येथील गांधीपुतळ्याला वंदन करून तिचा समारोप करण्यात आला. यावेळी ठाणे शहरातील वेगवेगळ्या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक भूमिपुत्रांनी, युवक-युवतींनी आपले विचार मांडले. या मशाल मोर्चाचे नियोजन ठाणे गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीने केले होते.