- नितिन पंडीत
भिवंडी- भिवंडी शहराबरोबरच ग्रामीण भागात सध्या आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे डिसेंबर व मार्च महिन्यात आगी लागण्याचे सत्र जास्त असते. अगिंच्या वाढत्या घटना लक्षात घेता शहर व ग्रामीण भागात वीज पुरवठा करणाऱ्या टोरंट पावर कंपनीकडून नागरिकांना सुरक्षीत वीज वापराचा सल्ला देण्यात आला आहे.
आगीच्या घटनांमुळे जिवीत व वित्त हानी होत असून नागरिकांच्या जीवाला देखील मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घर तसेच व्यवसायाच्या ठिकाणी विजेची सुरक्षित उपकरणे लावावीत तसेच या उपकारनांची वेळोवेळी तपासणी करावी. नवीन विद्युत जोडणी मान्यता प्राप्त व अनुभवी ठेकेदाराकडून करावी , नागरिकांनी अवैध पद्धतीने वीज चोरी करू नये , वीज चोरी करून घेण्यात येणाऱ्या विजेच्या वायर व उपकरणे हि साधारण असल्याने शॉर्टसर्किट होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विजचोरी टाळावी असे आवाहन देखील सोमवारी टोरंट पावरच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.