ठाणे : जिल्ह्यात शनिवारी ही ३९८ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्याचा आकडा हा सात हजार ७७१वर गेला आहे. त्याचबरोबर १६ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ही २३९ इतकी झाली आहे. शनिवारी नवी मुंबईत सर्वाधिक ७ जण दगावले असून एकूण रुग्णांनी दोन हजारांचा आकडा पार केल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.
नेहमीप्रमाणे शनिवारीही ठाण्यात सर्वाधिक १५१ नवीन रुग्ण सापडल्याने शहरातील एकूण रुग्ण संख्या ही दोन हजार ९०१ वर पोहोचली आहे. तसेच ५जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ८४ झाला आहे. त्या खालोखाल नवी मुंबईतील एकूण रुग्ण संख्या आता दोन हजार ११० तर मृतांचा आकडा ७० झाला आहे. कल्याण डोंबिवलीत ३८ रुग्णांची नोंद झाली असून येथील एकूण रुग्णांचा आकडा ९८० वर गेला आहे. तसेच एकाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या २८ इतकी झाली आहे. या ३८ रुग्णांमध्ये ९ रुग्ण डोंबिवलीतील असून उर्वरित रुग्ण हे कल्याणमधील आहेत. उल्हासनगरमध्ये ही ३० नवीन रुग्ण सापडल्याने तेथील एकूण रुग्णांची संख्या ३३५ झाली आहे. १८ रुग्ण मीरा-भार्इंदर येथे सापडल्याने तेथील रुग्ण संख्या ही ६४९ वर गेली आहे. तसेच तेथे दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २४ झाला आहे.भिवंडीत मृतांची संख्या सहाअंबरनाथ येथे १७ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या १३१ झाली आहे. १६ नवीन रुग्ण हे ठाणे ग्रामीण येथे सापडल्याने एकूण रुग्णांचा आकडा ३४३ वर गेला आहे. भिवंडी आणि बदलापूर येथे प्रत्येकी ७ नविन रुग्ण मिळाले आहेत. तेथील एकूण रुग्णसंख्या अनुक्रमे ११९ आणि २१३ झाली आहे. भिवंडीत एकाचा मृत्यू झाल्याने तेथील मृतांची संख्या ही ६ वर गेल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.