शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

रिपाईच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 5:23 PM

डोंबिवली: केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात रिपब्लिकन पक्षाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास घडला. जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे निष्क्रिय ठरले असून त्यांना हटवण्यात यावे या मागणीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रिपाई युवक आघाडी आणि झोपडपट्टी महासंघाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तेथे पोहोचलेल्या जिल्हाध्यक्ष जाधव यांनी सभेच्या आयोजकांना मारहाण केली. यावेळी काही महिलांना देखील हाणामारी झाल्याने सभागृहात उपस्थित असलेल्या महिलांनी जाधव यांना बेदम मारहाण केली. या घटनेमुळे रिपाईमधील गटबाजी उघड झाली असून या हाणामारीचा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले कसा समाचार घेतात याकडे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देजिल्हाध्यक्ष हटावचा वाद चिघळला

डोंबिवली: केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात रिपब्लिकन पक्षाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास घडला. जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे निष्क्रिय ठरले असून त्यांना हटवण्यात यावे या मागणीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रिपाई युवक आघाडी आणि झोपडपट्टी महासंघाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तेथे पोहोचलेल्या जिल्हाध्यक्ष जाधव यांनी सभेच्या आयोजकांना मारहाण केली. यावेळी काही महिलांना देखील हाणामारी झाल्याने सभागृहात उपस्थित असलेल्या महिलांनी जाधव यांना बेदम मारहाण केली. या घटनेमुळे रिपाईमधील गटबाजी उघड झाली असून या हाणामारीचा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले कसा समाचार घेतात याकडे लक्ष लागले आहे.केडीएमसीच्या विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सभेला पक्षाचे वरिष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे, युवक आघाडीचे संग्राम मोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीना साळवे, जिल्हा सचिव तथा माजी नगरसेवक भीमराव डोळस आणि झोपडपट्टी महासंघाचे स्थानिक अध्यक्ष माणिक उघडे आदि उपस्थित होते. या सभेच्या आधी पत्रकार परिषद झाली. पार पडलेल्या सभेत जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांना हटविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. जाधव यांच्या निष्क्रिय कारभारामुळे पक्षाची अधोगती झाली असून याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना सांगण्यात आले आहे जर आठवले यांनी महिनाभरात निर्णय घेतला नाहीतर नवीन कार्यकारीणी नेमून नवा जिल्हाध्यक्ष जाहीर करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. महापालिकेच्या अर्थसंकल्पात दलित वस्ती सुधारणा किंवा अन्य योजना अंतर्गत एकुण अर्थसंकल्पाच्या टककेवारीनुसार (सुमारे १० टकके) देखिल तरतूद केली जात नसल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा येत्या १४ एप्रिलच्या आत बसविण्यात यावा या मागणीसह १६ मार्चला दिल्ली येथे होणा-या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनासंदर्भात सभेत मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान सभा सुरू असताना अचानक जिल्हाध्यक्ष जाधव हे त्याठिकाणी पोहोचले आणि आयोजकांना तुम्हाला सभा घेण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल करीत त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. अचानक झालेल्या प्रकाराने सभागृहात एकच गोंधळ उडाला. व्यासपिठावर उपस्थित असलेल्या डोळस, उघडे यांना जाधव यांच्याकडून मारहाण करण्यात आली. यावेळी मध्यस्ती करणा-या महिलांना देखील जाधव यांनी मारहाण केली. यात महिलांकडूनही जाधव यांना बेदम मारहाण करण्यात आली. या हाणामारीची माहीती मिळताच महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी सभागृहाच्या दिशेने धाव घेतली. स्थानिक रामनगर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. तेथील सहाय्यक पोलिस निरिक्षक रवींद्र वाडेकर आणि वरीष्ठ पोलिस निरिक्षक विजयसिंह पवार यांनी घटनास्थळी धाव घेत हाणामारी करणा-यांना ताब्यात घेतले. मी गेली २० ते २५ वर्षे जिल्हाध्यक्ष आहे. सोशल मिडीयावर काहीजण चुकीची पोस्ट टाकत असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत त्याबाबत आपण एमएफसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. जेव्हा एखादा कार्यक्रम करताना शहरातील प्रमुख पदाधिका-यांना माहीती देणे आवश्यक होते परंतू त्यांनी कोणतीही विचारणा केलेली नाही. मी फक्त समजविण्यासाठी गेलो होतो कोणालाही मारहाण केलेली नाही अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली. तर महिलांना मारहाण केल्याप्रकरणी जाधव यांच्याविरोधात आम्ही विनयभंगाची तक्रार करणार असल्याची माहीती महिला जिल्हाध्यक्ष मीना साळवे यांनी दिली. दरम्यान याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली