शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

डिझेल मिळाल्यानंतर एसटी ठाण्यात रुळावर; १५० गाड्या डिझेलविना होत्या उभ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 8:02 AM

ठाणे जिल्ह्यातील १ नंबरचा डेपो म्हणून खोपट डेपोची ओळख आहे; परंतु या डेपोवर सोमवारपासून डिझेल नसल्याने एसटीच्या सुमारे १५० बसेस येथे उभ्या असल्याचे दिसून आले.

ठाणे : मागील पाच दिवसांचे डिझेलचे पैसे न दिल्याने ठाण्यातून सुटणाऱ्या तब्बल १५० एसटीच्या बसेस खोपट आगारात थांबल्याची बाब उघड झाल्यानंतर बुधवारी एसटीचे ‘ऑपरेशन’ पुन्हा सुरू झाले आहे. मंगळवारी रात्री डिझेलचा एक टँकर उपलब्ध झाल्यानंतर बुधवारी १५० हून अधिक बसेस रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली.

ठाणे जिल्ह्यातील १ नंबरचा डेपो म्हणून खोपट डेपोची ओळख आहे; परंतु या डेपोवर सोमवारपासून डिझेल नसल्याने एसटीच्या सुमारे १५० बसेस येथे उभ्या असल्याचे दिसून आले. यामध्ये शिवनेरी, शिवशाही बसेसचादेखील समावेश होता. या डेपोतून कोकणातील सर्व मार्गांवर तसेच नाशिक, शिर्डी, नगर, सातारा, कराड, कोल्हापूर, बेळगाव, वडुज, दहीवडी, अलिबाग, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर आदींसह राज्यातील इतर प्रमुख मार्गांवर बसेस धावत असतात. सोमवारी दुपारनंतर यातील एकही बस रस्त्यावर धावू शकली नव्हती. डिझेल पंप चालकांचे पाच दिवसांचे ६५ लाख रुपये थकविल्याने एसटी महामंडळावर ही नामुश्की ओढवली होती. मंगळवारी दुपारनंतर ही समस्या मार्गी लागेल, असा दावा एसटी विभाग ठाणे यांच्याकडून करण्यात आला होता. परंतु तो दावादेखील फोल ठरला.

मंगळवारी रात्री जेमतेम एक टँकर दाखल झाल्यानंतर रात्रभर १५० बसेसमध्ये डिझेल टाकण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळपासून एसटीची सेवा पुन्हा सुरू झाली. यामध्ये शिवनेरी आणि शिवशाही बसेसदेखील बाहेर निघाल्याची माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली. परंतु केवळ एकच टँकर उपलब्ध झाल्याने तूर्तास दिलासा मिळाला असला तरी रेग्युलर टँकर उपलब्ध होणार का, याबाबत मात्र शंका उपस्थित करण्यात आलेली आहे. तसेच डिझेल पंप चालकाला अर्धे पैसे दिल्यानंतर हा एक टँकर उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे पुन्हा तो केव्हा असहकार पुकारेल याबाबतही नेम नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंगळवारी रात्री डिझेलचा एक टँकर उपलब्ध झाल्यानंतर सुमारे १५० बसेसमध्ये डिझेल भरण्यात आले असून, त्या बुधवारी सकाळपासून मार्गस्थ झालेल्या आहेत. नेहमीप्रमाणे आता या बसेस रस्त्यावर धावणार आहेत. - विनोदकुमार भालेराव, विभागीय नियंत्रक, ठाणे)