शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

दिवाळीत ठाणेकरांची घरे प्रकाशमान होणार पारंपरिक कंदिलांनी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 12:27 AM

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण आला आहे. त्यानिमित्ताने घरांसमोरचा परिसर उजळून टाकणाऱ्या आकाशकंदिलांनी ठाण्यातील दुकाने, बाजारपेठा सजल्या आहेत.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण आला आहे. त्यानिमित्ताने घरांसमोरचा परिसर उजळून टाकणाऱ्या आकाशकंदिलांनी ठाण्यातील दुकाने, बाजारपेठा सजल्या आहेत. यंदाही पारंपरिक कंदिलांचाच तोरा दिसून येत आहे. यात आकर्षण ठरत आहे, तो प्रथमच बनवण्यात आलेला १० फुटांचा पारंपरिक दीपस्तंभ. यंदा नव्याने तयार करण्यात आलेले पेपरचे बॉल्स, षटकोन झुमर, पॅराशूट झुमरदेखील ठाणेकरांच्या घरांसमोर दिसणार आहे.दिवाळी निमित्त शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. ठिकठिकाणी कंदिलांव्यतिरिक्त रांगोळी, उटणे, पणत्या, फराळांची विक्री सुरू झाली आहे. ठाणेकरांना आकर्षित करण्यासाठी नवीन प्रकारांचे कंदील आले आहेत. पारंपरिक कंदिलांमध्ये चारकोन, पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन, मटकी हे प्रकार पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा पारंपरिक कंदिलांनाच मागणी आहे. आम्ही कंदिलांमध्ये चायना मार्केट बंद केले. गल्लीबोळांत पारंपरिक कंदील दिसणे, हा उद्देश आहे, असे हस्तकलाकार कैलाश देसले यांनी सांगितले.>फ्लोरोसेंट कलरच्या कंदिलांची भुरळकंदिलांमध्ये यंदा फ्लोरोसेंट कलर पाहायला मिळत आहे. या रंगांच्या कंदिलांनी ठाणेकरांना भुरळ घातली आहे. मल्टिमिक्स रंगांचे कंदीलही विक्रीसाठी आहेत. कपडा, बांबू, लाकडाच्या पट्ट्या यापासून बनवलेल्या १० फुटांच्या पारंपरिक दीपस्तंभालाही ठाणेकरांनी पसंती दिली आहे.परदेशातही गेले पारंपरिक कंदीलठाणेकरांप्रमाणे परदेशी नागरिकांनीही पारंपरिक कंदिलांना पसंती दिली आहे. सिंगापूर, अमेरिका, आॅस्ट्रेलिया यासारख्या देशांत पारंपरिक तसेच बांबूचे कंदील परदेशात गेले आहेत.>दिव्यांगही गुंतलेत कंदील बनवण्यातदिव्यांगांच्या हातांना काम मिळावे, यासाठी देसले त्यांना कामात सहभागी करून घेतात. विविध कंदील बनवण्यात १0 दिव्यांगांचे हात गुंतले आहेत. याशिवाय तीन इंचांपासून सहा इंचांचे छोटे कंदीलही विक्रीसाठी आहेत. सोसायट्यांनी एकसारख्या कंदिलांचे बुकिंग केले आहे.