कल्याण : कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या जुन्या पत्री पूलाचे नव्याने उभारण्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. त्यावर ठेवण्यासाठी जो गर्डर तयार करण्यात आला आहे. तो ठेवण्यासाठी अस्तित्त्वात असलेल्या पूलावर भली मोठी क्रेन ठेऊन काम केले जाणार आहे. हे काम करण्यासाठी १९ ते २४ ऑगस्ट दरम्यान सात दिवस रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत पूलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कल्याण-शीळकडे पत्रीपूल मार्गे जाण्यासाठी कल्याण भिवंडी बायपास सर्कल नजीक राजनोली नाक्यावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनांनी इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी खारेगाव टोलनाका, मुंब्रा बायपासमार्गे इच्छित स्थळी जावे.
कल्याण शहरातून कल्याण शीळ मार्गे पत्रीपूलावरुन वाहतूक करणा-यांना हलक्या व मध्यम वाहनांना दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने आधारवाडी चौक, खडकपाडा सर्कल, भवानी चौक, नेताजी सुभाष चौक, वालघूनी रेल्वे उड्डाणपूलावरुन आनंद दिघे पूलाकडे जाऊन इच्छित स्थळी मार्गस्थ होतील. कल्याण नगर रोडवरुन पत्रीपूलाकडे जाणा-या वाहनांना नेताजी सुभाष चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे.
ही वाहने वालधूनी रेल्वे उड्डाणपूलावरुन इच्छित जातील. कल्याण शीळ फाटा रोडवरून कल्याण पूर्व व पश्चिमेकडे वाहतूक करणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना कल्याण सूचकनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. कल्याण पूर्वेकडून कल्याण पश्चिमेकडे जाणारी सर्व वाहने सूचकनाका येथे वळण घेऊन इच्छित स्थळी मार्गक्रमण करतील. कल्याण फाट्याकडून कल्याण पश्चिमेत येणारी वाहने खारेगाव टोलनाक्याकडून इच्छित स्थळी रवाना होतील. ही अधिसूचना वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी काढली आहे. ही अधिसूचना सात दिवस अंमलात राहणार आहे.
आणखी बातम्या...
शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन
यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा
'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया
भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा
अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर
शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय
"पीएम केअर्स पारदर्शी, कोरोना संकट काळात 3100 कोटी रुपयांची मदत"