ठाणे : येथील पश्चिमेकडील स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या मनमानी मुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. सँटीसवर जाणार्या बसेसमुळे अशोक टाँकीजपासून प्रभात थेटर, जिल्हा परिषदेपर्यंत या बसेसची कोंडी सर्वांचे दक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे पातचारी प्रवाशांचे हाल होत आहे. येथील स्टैशन परीसरात असलेला सँटीसपूल रेल्वे व बस प्रवाश्यांसाठी वरदान धरला आहे. येथील टीएमटी बसेच्या सेवेमुळे प्रवाशांना ठाणे महानगरांतील कोणत्याही कोपर्यात जाणे शक्य झाले आहे. याशिवाय या पूलावरुन जवळच्या आगारातील एसटी बसेसही जिल्ह्यातील शहरांसह गांवोगावी जात आहे. त्यामुळे या दोन्ही बसेस सतत येजा करीत असल्यामुळे या पुलापासून थेट अशोक थेटर पर्यंत च्या रोडावर या बसेसची कोंडी ठाणेकरांना त्रासदायक ठरली आहे. यामुळे येथील बाजारपेठेतील ग्राहक रोडावल्यामुळे दुकानदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या सँटीस पुलावर तलावपालीकडून येणार्या बसेस प्रमाणेच कोर्टनाक्यावरुन बाजारपेठेतील रोडवरून टीएमटीच्या बसेस येत आहे. या दोन्ही रोडने येणार्या बसेस अशोक थेटरजवळ एकत्र येत असल्यामुळे या ठिकाणी बसेसची कोंडी जीवघेणी ठरली आहे. एसटी बस आगाराजवळील रीक्षा स्टँडवर उभ्या असलेल्या रिक्षांनाही प्रवासी मिळत नाही. त्यामुळे तासनतास या रिक्षा रस्तेच्या कडेला व सँटीस खाली प्रवाश्यांच्या प्रतिक्षेत थांबत आहेत. या कोंडीमुळे बस प्रवाश्यांनाही गाडीतच बसून राहावे लागत आहे. तर काही प्रवाशी लोकल पकडण्यासाठी चालू गाडीतून उतरुन पुढे जात असल्याचै वास्तव आहे.