शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

वाहतूक विस्कळीत ! २७ गावांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 4:26 AM

वाहतूक विस्कळीत : राज्य सरकारच्या निषेधार्थ पिसवली येथे रास्ता रोको

कल्याण : केडीएमसीतून २७ गावे वगळावीत, त्यांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिसवली येथे टाटा नाका चौकात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांतर्गत कल्याण-शीळ मार्गावर पाच ते सात मिनिटे रास्ता रोको करण्यात आला. परंतु, यावेळी मानपाडा पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्याचा फटका वाहनांना बसल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करा, बंद असणारे रजिस्ट्रेशन तत्काळ सुरू करावे, २७ गावे वगळण्याबाबतची अधिसूचना ७ सप्टेंबर २०१५ ला जाहीर होऊनही त्याची अंमलबजावणी का झाली नाही, यांसह अन्य मागण्यांकडे सरकारच्या होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे आंदोलन छेडण्यात आले. आमदार जगन्नाथ (अप्पा) शिंदे, डॉ. वंडार पाटील, महेश तपासे, अर्जुनबुवा चौधरी, पारसनाथ तिवारी, रमेश हनुमंते, सुधीर पाटील, उमेश बोरगावकर, वल्ली राजन, राजेश शिंदे, गुलाब वझे, बाबाजी पाटील, दत्तात्रय वझे, जानु वाघमारे, प्रल्हाद भिल्लारे, सारिका गायकवाड यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. टाटा नाका चौकात प्रारंभी भाजपा-शिवसेना सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात आली. ‘नागपूरचा पोपट काय म्हणतो, ग्रामीणला न्याय नाय म्हणतो,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्याविरोधात नारेबाजी करण्यात आली. आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. परंतु, पोलिसांसमोरच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येत ठिय्या मांडला. मार्ग रोखताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदार प्रवीण पाटील यांना निवेदन दिले. दरम्यान, मानपाडा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.आंदोलकांनाही बसला फटका : आधीच पत्रीपुलाच्या कोंडीमुळे वाहने संथगतीने जात असताना या रास्ता रोकोमुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबली. आंदोलनकर्त्यांना पाच ते सात मिनिटांत बाजूला करण्यात आले. परंतु, बाजूला केलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण रोडकडील वाहतूक रोखून धरल्याने एकूणच वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा फटका कल्याणहून येणाऱ्या काही आंदोलकांनाही बसला. आंदोलनस्थळी ते उशिराने दाखल झाले.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस