शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

आसनगाव स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 7:19 PM

आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान मंगळवारी संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी एका मालगाडीचे इंजिन बंद पडले, त्यामुळे डाऊन मार्गावरून कसा-याला जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली होती. त्यापाठोपाठ ट्रान्स हार्बरमार्गावरील ऐरोली स्थानकादरम्यान 5 वाजून 40 मिनिटांनी एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला.

ठाणे- आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान मंगळवारी संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी एका मालगाडीचे इंजिन बंद पडले, त्यामुळे डाऊन मार्गावरून कसा-याला जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली होती. त्यापाठोपाठ ट्रान्स हार्बरमार्गावरील ऐरोली स्थानकादरम्यान 5 वाजून 40 मिनिटांनी एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ती लोकल जागीच उभी राहिली. परिणामी ट्रान्स हार्बरची वाहतूक कोलमडली.मुख्य मार्गावर वाहतूक सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं कसारा रेल्वेस्थानकातून एक विशेष इंजिन आसनगावच्या दिशेनं नेलं आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी बंद पडलेली वाहतूक पुन्हा हळूहळू पूर्वपदावर आली. पण त्या दरम्यान टिटवाळा ते आसनगाव डाऊन मार्गावर दोन लोकल गाड्यांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे असंख्य प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकमध्ये उतरून आसनगाव स्थानक गाठण्याचा प्रयत्न केल्याची माहिती कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे शैलेश राऊत यांनी दिली.ऐरोली मार्गावरील घटनेमुळे प्रवासात अडकलेल्या प्रवाशांनी ठाणे खाडी पुलावर उतरून ठाणे स्थानक गाठण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही घटना संध्याकाळच्या वेळेत घडल्यानं चाकरमान्यांच्या हालाला पारावार उरला नव्हता.