ठाणे - ठाणे शहरात शुक्रवारी पहाटेपासून वाहतूक कोंडीचा अभूतपूर्व असा खेळखंडोबा झाला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मुंबई -नाशिक महामार्गवर वाहनांनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अवघे 200मीटरचें अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना एक तासाचा कालावधी लागतं होता. यामुळे सकाळच्या वेळी शाळेत जाणारे विद्यार्थी कामावर जाणाऱ्या नागरिकांना तात्कळत उभे राहावे लागले.
ठाण्याहून भिवंडी, नाशिकच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने साकेत पूल ते माजिवडा नाकापासून अगदी घोडबंदर कासारवडवली नागला बंदर वाहतूक कोंडीत अडकली . याचवेळी भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर साकेत पूल ते भिवंडीतील रांजनोली नाका येथपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अवघ्या १५ ते २० मिनीटांचे अंतर पार करण्यास वाहनांना अंदाजे दोन तास लागत होता. याचा अधिकचा फटका सकाळच्या वेळेस शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला अनेक विद्यार्थी रस्त्यातच अडकले होतें. या वाहतूक कोंडीत रिक्षा आणि ठाणे परिवहन सेवेच्या बसेस. बेस्ट च्या बसेस अडकल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.
मागील तीन दिवसांपासून ठाणे शहरात सतत पडत असलेल्या पावसाने आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यापायी शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होतं असून त्याचा नाहक त्रास वाहचालक आणि नागरिकांना सहन करावा लागतं आहे.विशेष म्हणजे घोडबंदर मार्गांवरही बोरिवलीच्या दिशेच्या मार्गीकेवर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.त्यातच जोरदार पाऊस झाल्याने येथून जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदवला गेला.
परिणामी या मार्गांवरही सकाळपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती . महत्वाची बाब म्हणजे इतर वेळी रस्त्यावर उभे वाहतूक पोलीस कर्मचारी मात्र कुठेच दिसून आलें नाहीत. स्थानिक नागरी आणि काही रिक्षाचालक रस्त्यावर उतरून ही वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत होतें.त्यातही मधून मधून पावसाच्या सरी बरसत असल्याने अडचणीत आणखीनचं भर पडत होती.मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत न घेतल्याने रस्त्यावरील खड्डे भरण्यातही संबंधित यंत्रणानां अडचण येतं आहे. घोडबंदर मार्गांवरून ठाणे मुंबई कल्याण नवी मुंबई आदी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक कामावर जात असतात या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना कार्यालयात पोहचण्यास उशीर झाला. तर काही जणांनी पुन्हा घरी जाणेच पसंद केले.