- नारायण जाधव नवी मुंबई - आधीच मुसळधार पाऊस अन् त्यात कंटेनर बंद पडल्याने मुलुंड -ऐरोली खाडीपुलावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याअसून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची दमछाक होत आहे
ऐरोली मुलुंड रात्रीपासून ट्रॅफिक जाम आहे. १० मिनिटांच्या प्रवासासाठी १ ते १.५ तास लागतो. त्यातच या भागात ऐरोली काटई मार्गातील पुलाचेही काम सुरू आहे. यामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचेही कोंडीमुळे मोठे हाल होत आहेत नवी मुंबईतीलठाणे-बेलापूर मार्गावरही मोठी वाहतूककोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने टीटीसी औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्या व आयटी पार्क मध्ये कामावर जाणाऱ्यांचे हाल होत आहेत. रस्ते मार्गे प्रवास करणाऱ्या अनेकांनी लोकलचा आधार घेतल्याने तीवरील ताण वाढला आहे