शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

अपघातामुळे ठाण्यात वाहतूक कोंडी: एकाच्या धडकेने दुसरा ट्रक उलटला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 3:44 PM

पाठीमागून आलेल्या ट्रकच्या धडकेने पुढचा ट्रक रस्त्यावर मधोमध उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नितीन कंपनी उड्डाणपुलावर घडली. त्याचवेळी ट्रकमधील आॅईलही रस्त्यावर पसरल्यामुळे ठाण्यातील मुंबई- नाशिक महामार्गावर सकाळीच मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात किशोर (३०) आणि रफीक शेख (२५) हे दोघे जखमी झाले आहे.

ठळक मुद्दे रस्त्यावर आॅईल सांडले दोघेजण गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पाठीमागून आलेल्या ट्रकच्या धडकेने पुढचा ट्रक रस्त्यावर मधोमध उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नितीन कंपनी उड्डाणपुलावर घडली. त्याचवेळी ट्रकमधील आॅईलही रस्त्यावर पसरल्यामुळे ठाण्यातील मुंबई- नाशिक महामार्गावर सकाळीच मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात किशोर (३०) आणि रफीक शेख (२५) हे दोघे जखमी झाले असून त्यांना ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराजरु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ट्रकचालक किशोर (30) हा रिकामा ट्रक घेऊन ठाण्यातून भिवंडीकडे जात होता. हा ट्रक नितीन कंपनी उड्डाणपुलावरून जात असताना, ठाण्यातून वसईकडे जाण्यासाठी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या रकिक शेख याच्या ट्रकने किशोरच्या ट्रकला धडक दिली. हा अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, किशोरचा ट्रक पुढे जाऊन रस्त्याच्या मधोमध जाऊन उलटला. याचदरम्यान ट्रकमधील आॅईल आणि डिझेल रस्त्यावर पसरले. रस्त्याच्या मधोमध ट्रक उलटल्याने तसेच आईलही पसरल्यामुळे या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ही माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही ट्रकचे चालक जखमी झाले होते. भिवंडीतील जखमी चालक किशोरच्या डोक्याला तर नालासोपारा येथील रफिकच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.त्यांना तातडीने ठामपाच्या कळवा येथीलरु ग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उलटलेला ट्रकही क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आला. रस्त्यावरील आॅईलमुळे वाहने घसरू नये, म्हणून त्याठिकाणी पाण्याचा मारा करुन सफाई करण्यात आली. या दरम्यान मुंबई येथून ठाणे मार्गे नाशिककडे जाणारी वाहतूक एकाच मार्गिकेवरून धीम्या गतीने सुरु ठेवण्यात आली होती. एकाच मार्गिकेवर काही काळ वाहतूक वळविण्यात आल्याने सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ठाण्यात वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले होते. सकाळी ८.३० वाजेनंतर ही वाहतूक सुरुळीत झाल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात