ठाणे येथील मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम ब्रम्हांड सिग्नल ते पातलीपाडा ब्रिज घोडबंदर रोड येथे सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी या रोडवरील वाहतूक २५ ते ३० डिसेंबरपर्यंत रात्री ११.५५ वाजेपासून सकाळी ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली. त्यामुळे दरम्यान या मार्गावर येणाऱ्या ठिकठिकाणच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
या गर्डर टाकण्याच्या कामा दरम्यान मुंबई-नाशिक महामागार्ने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहनांसाठी पयार्यी मार्ग म्हणून मुंबई, ठाणेकडून येणारी वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जाण्यास परवानगी दिली आहे. याप्रमाणेच कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी वाहन जातील.
मुंब्रा, कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहने गॅमन मार्गे खारेगाव खाड़ी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अनुरफाटा मार्गे जातील. याप्रमाणेच नाशिककडून जाणाच्या सर्व वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्यामुळे ही वाहने मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. तर जड अवजड वाहने सोडून इतर हलकी वाहने ही गर्डर टाकणेचे वेळी ब्रम्हांड सिग्नल ते पातलीपाडा ब्रिज घोडबंदर रोड या दरम्यान मुख्य रस्त्याचे एका वाहिनीने पुढे इच्छित स्थळी जाण्यास परवानगी दिली आहे.