शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण दौऱ्यानिमित्त वाहतूक मार्गामध्ये बदल, वाहतूक शाखेची अधिसूचना

By जितेंद्र कालेकर | Published: May 13, 2024 11:12 PM

पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन: ठाणे, शीळ कल्याण, उल्हासनगर मार्गांमध्ये बदल

ठाणे: महायुतीचे कल्याणचे लाेकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ मे रोजी कल्याण येथील व्हरटेक्स मैदान येथे येणार आहेत. या सभेमुळे ठाणे आणि कल्याण परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल केल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी सोमवारी दिली.आपल्या अधिसूचनेमध्ये उपायुक्त डॉ. राठोड यांनी म्हटले आहे की, नाशिककडून खारेगाव टोलनाका येथून डावे वळण घेउन मुंब्रा बायपासमार्गे जेएनपीटी तसेच इतर ठिकाणी जाणाऱ्या मार्गावरील सहा चाकी आणि त्यापेक्षा जास्त चाकांवरील माल वाहतूक करणाऱ्या सर्व माेठया वाहनांना खारेगाव टोलनाका येथे १५ मे २०२४ रोजी प्रवेश बंद राहणार आहे. त्याऐवजी ही वाहने खारेगाव टोलनाका येथून डावीकडे न वळता मुलूंड ऐरोली मार्गे पुढे जातील. त्याचबरोबर नाशिककडून रांजणोली येथून डावे आणि उजवे वळण घेऊन कोनगाव एमआयडीसीकडून दुर्गाडी दिशेने कल्याणकडे येणाऱ्या मार्गावरील मालवाहतूक करणाऱ्या सर्व मोठया वाहनांना रांजनोली नाका येथे प्रवेश बंद राहणार आहे.त्याऐवजी ही वाहने रांजनोली नाका येथून सरळ खारेगाव टोलनाका मार्गे पुढे जातील.शीळ कल्याणमार्गे पत्रीपूलाकडे मालवाहतूक करणाऱ्या सर्व मोठया वाहनांना बदलापूर चौक येथे प्रवेश बंद राहील. त्याऐवजी ही वाहने बदलापूर चौक येथून यू टर्न घेऊन लोढा पलावा मार्गे कल्याण फाटा- महापे- आनंदनगर चेकनाका मार्गे जातील. तसेच उल्हासनगर शहरातून वालधुनी पुलावरुन कल्याणच्या दिशेने येणाऱ्या मालवाहतूकीच्या मोठया वाहनांना उल्हासनगर शहरात शांतीनगर जकात नाका ये प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने शांतीनगर जकात नाका येून डावे वळण घेऊन पुढे जातील. त्याचबरोबर विठ्ठलवाडीकडून वालधुनी पुलावरुन कल्याण दिशेने मालवाहतूक करणाऱ्या सर्व मोठया वाहनांना विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनसमोर प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने उल्हासनगरच्या श्रीराम चौकातून पुढे जातील.* मुरबाडवरुन शहाड ब्रिज मार्गे कल्याणच्या दिशेने येणाऱ्या मोठया वाहनांना म्हारळ जकात नाका येथे प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने म्हारळ जकात नाका येथून डावे वळण घेऊन उल्हासनगर मार्गे पुढे जातील.* नाशिक महामार्गावरुन बदलापूर, नवी मुंबई, पुणे, उरण, न्हावाशेवा येथे जाण्यासाठी पर्यायी मार्गावरुन वाहतूक होत आहे. ही वाहतूक बापगाववरुन गांधारी मार्गे होत असते. मालवाहतूक करणाऱ्या सर्व मोठया वाहनांना ठाणे ग्रामीण हद्दीतील पडघा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळवली चौकी येथे प्रवेश बंद राहील. त्याऐजी ही वाहने ठाण्याच्या दिशेने सरळ मुलूंड ऐरोली मार्गे पुढे जाण्याचे नियोजन आहे. अशाच प्रकारे कासारवडवली, मुंब्रा, भिवंडी, नारपोली आणि विठ्ठलवाडी भागातही काही मार्ग बंद केले असून त्याऐवजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीthaneठाणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४