शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
2
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
3
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
4
जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक
5
आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आलेली आहे! मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर भडकले आदेश बांदेकर
6
मराठी अभिनेत्रीने सांगितला विराट कोहलीसोबत शूटिंगचा अनुभव, म्हणाल्या, "माझ्या मुलीसाठी त्याने..."
7
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ
8
सोन्याच्या किमतीचा नवा विक्रम! १० ग्रॅमसाठी तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या
9
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
10
सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
11
बदल्याची आग! उपचाराच्या बिलामुळे झाला कर्जबाजारी, रुग्णालयात चोरी करणारा हायटेक चोर
12
एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती?
13
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
14
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
15
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
16
वरमाला पडली अन् नवरदेवाने दिलेले दागिनेच खोटे निघाले; मग काय नवरीने...
17
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
18
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
19
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
20
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आता एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमतेची जरब

By धीरज परब | Updated: April 18, 2025 16:11 IST

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात बेशिस्त आणि अनेक राजकीय वजन असलेल्या वाहनांकडून सर्रास वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते

मीरारोड- वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या तसेच वाहतूक पोलीस दिसत नाही पाहून जाणीवपूर्वक मनमानी करणाऱ्या बेजबाबदार वाहन चालकांवर आता एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमतेच्या मदतीने दंड आकारण्याची कारवाई मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने सुरू केली आहे. 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात बेशिस्त आणि अनेक राजकीय वजन असलेल्या वाहनांकडून सर्रास वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यातच वाहतूक पोलीस नसेल तर नियम पायदळी तुडवले जातातच पण पोलीस असला तरी त्याच्या समक्ष वा त्याला चकवा देऊन नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक देखील कमी नाहीत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने अपघात घडणे, वाहतूक कोंडीसारखे प्रकार सतत घडत असतात. 

शहरातील प्रमुख नाके व रस्त्यांवर पोलिसांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले आहेत. महापालिकेने कॅमेरे लावले असले तरी अनेकदा त्याचे रेकॉर्डिंगपासून देखभाल दुरुस्ती आदींचा प्रश्न असतो. मोठ्या प्रमाणातील सीसीटीव्हीच्या जाळ्यामुळे अनेक लहान मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत. 

पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी वाहतुकीचे उल्लंघन रोखण्यासाठी एआय तंत्रज्ञानचा वापर करून मल्टी व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम द्वारे स्मार्ट ट्रॅफिक यंत्रणा सुरू केली आहे. सदर प्रकल्प मार्चपासुन पायलट प्रोजेक्ट म्हणुन सुरू असून त्याचे पहीले चलन ७ एप्रिल रोजी जारी करण्यात आले होते. 

पोलीस आयुक्तालयातील वाढती वाहतुक, अपघाताचे वाढते प्रमाण व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी कृत्रीम बुध्दीमत्तेवर आधारीत एक प्रगत आणि स्मार्ट वाहतुक व देखरेख प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. हि प्रणाली कृत्रिम बुध्दीमत्ता वापरुन वाहतुक नियमांचे उल्लंघन ओळखुन त्यावर त्वरीत कारवाई करण्यास मदत होणार आहे. सदर प्रणालीद्वारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, ई-चलनासाठी थेट फोटो पुरावे, सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतुक व्यवस्था, पारदर्शक व अचूक दंड प्रणाली, अपघातांमध्ये व जनजीवनात सुधारणा असे फायदे होणार आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त पांडेय यांनी दिली.

सदर  प्रणालीमुळे कायदयाची अंमलबजावणी करता-करता नागरिकांचे प्राण वाचविणे आणि वाहतुकिचे नियम पाळण्याची सवय होण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरेल. ही प्रणाली शिस्त, सुरक्षा आणि तंत्रज्ञान याचे परिपुर्ण उदाहरण आहे. वाहतुक व्यवस्थापनात एक महत्वपुर्ण तांत्रिक झेप असून  सध्याच्या पायाभूत सुविधांच्या मर्यादांमध्ये काम करतांना रिअल टाइम अंतर्दृष्टी देऊन कारवाईत मानवी प्रयत्न कमी करण्यासह कार्यक्षमता वाढवण्याचे उदाहरण आहे. 

वाहतुकीचे उल्लंघन करतात कॅमेरामधील रेकॉर्डिंगचा मनुष्यबळ ऐवजी एआयचा वापर होत आहे. मनुष्यबळ वाचून वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा कमी होणार आहे. सुरवातीला विना हेल्मेट, सीट बेल्ट, ट्रिपल सीट वर कारवाई सुरु केली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ओव्हर स्पिडिंग, रॉंग साईड आदी उल्लंघन कॅमेरे डिटेक्ट करणार आहेत. राज्यातील हा बहुतेक पहिलाच प्रयोग असावा असे आयुक्त म्हणाले. यावेळी मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड सह अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :thaneठाणे