पंकज रोडेकरठाणे : उन्हाळी सुटीमध्ये गावी जाणाऱ्यांसोबत बॅगांची संख्या जास्त असल्याने अनेकदा सामानसुमान रेल्वेगाड्यात चढवण्याच्या नादात बऱ्याचदा लहान मुले आणि वयोवृद्धांकडे दुर्लक्ष होऊन ते मागे राहण्याचे प्रकार ठाणे स्थानकात घडत आहेत. त्यातून अपघात घडण्याची शक्यता असते. गाडीची चेन खेचल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे अतिरिक्त सामान नेणाऱ्यांनी लहान मुले व वृद्धांना सर्वप्रथम रेल्वेत प्रवेश करू द्या, असे आवाहन रेल्वे पोलीस व अधिकाऱ्यांनी केले आहे.
सुटीत गावी जाण्यासाठी रेल्वेचे बुकिंग काही महिने अगोदर करण्यात येते. दीर्घकाळ प्रवासाला जाणारे आपल्यासोबत छोट्या-मोठ्या गरजेच्या वस्तू घेतात म्हणून बॅगांची संख्या वाढते. बाहेरगावच्या गाड्या फलाटावर जेमतेम चार ते पाच मिनिटे थांबतात. वजनदार बॅगा घेऊन डब्यात चढताना बायकांचा गोंधळ उडतो. मुलांचा हात सुटतो. गोंधळात कुणी खालीच राहिल्यास लक्षात येत नाही. बºयाचदा बॅगा चढवण्याच्या नादात लहान मुले-वयोवृद्धांना गर्दीत चढता येत नाही. ते फलाटावरच राहून जातात. असे प्रकार ठाणे रेल्वेस्थानकात पाहण्यास मिळत आहेत. फलाटावर राहिलेले वृद्ध रेल्वेस्टेशन मॅनेजरकडे येतात किंवा फलाटावर एकटी राहिलेली मुले रडतरडत स्टेशनवर आणली जातात. मुलगा किंवा वडील खाली राहिल्यामुळे पुढील कल्याण किंवा कर्जत-कसारा स्थानकांवर बॅगासह उतरून अन्य डब्यात चढलेल्यांना परत माघारी यावे लागते. बाहेरगावी जायच्या नियोजनावर पाणी सोडावे लागते. असा गोंधळ उडालेली मंडळी रेल्वे अधिकाऱ्यांवर राग काढतात. तिकिटांच्या पैशांची भरपाई देण्याची मागणी करतात. त्यामुळे अगोदर मुले व वृद्ध यांना रेल्वेगाडीत प्रवेश करू द्या, असे आवाहन केले आहे.
...आणि मुलगी फलाटावरपवन एक्स्प्रेस रविवारी दुपारी थोडीशी उशिरा आली. या गाडीने प्रवास करणाºया एक कुटुंबासोबत असलेली पाच वर्षांची मुलगी गडबडीत फलाटावरच राहिली. हे लक्षात येताच एकाने चेन खेचून गाडी थांबवली. त्यानंतर, त्या चिमुरडीला घेतल्यानंतर गाडी सोडण्यात आली. यामुळे रेल्वे कर्मचाºयांना मनस्ताप झाला.
आजी-नातू राहिले खालीचशनिवारी ठाण्यातून आजीआजोबा नातवाला घेऊन औरंगाबादला चालले होते. आजोबा गाडीत चढले, तोच गाडी सुटल्याने आजी आणि नातू खाली राहिले. हे लक्षात आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्याने गार्डला इशारा करून गाडी थांबवली. त्यानुसार, गाडी थांबल्यावर आजी-नातू गाडीत चढले आणि गाडी सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली.