शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रेल्वे फाटकाला टेम्पोची धडक

By admin | Published: October 07, 2016 5:16 AM

रेल्वे फाटक बंद होत असताना टेम्पोने त्याला धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी २.३५ च्या सुमारास ठाकुर्ली रेल्वेस्थानकात पूर्वेला घडली

रेल्वे फाटकाला टेम्पोची धडकडोंबिवली : रेल्वे फाटक बंद होत असताना टेम्पोने त्याला धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी २.३५ च्या सुमारास ठाकुर्ली रेल्वेस्थानकात पूर्वेला घडली. सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक १५ मिनिटे थांबवण्यात आली. सिग्नल यंत्रणेवरही त्याचा परिणाम झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाने टेम्पोसह चालक सुरेश याला ताब्यात घेतले.ठाकुर्लीत पूर्वेला रेल्वे फाटकानजीक तीन रस्ते एकत्र येत असल्याने नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी वाहनांच्या रांगा लागतात. दररोज मर्यादेपेक्षा अधिक वेळ फाटक उघडे राहते. तसेच फाटक उघडे ठेवण्यासाठी वाहनचालकांनी रेल्वे कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्याच्या घटना घडल्या आहेत. गुरुवारी दुपारी २.३५ च्या सुमारास फाटक बंद होत असताना सुरेश टेम्पो घेऊन घुसला. त्याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. फाटक टेम्पोच्या काचेवर आपटल्याने काच फुटली. फाटकही मोठ्या प्रमाणात वाकले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे तेथील अधिकारी अमित जैन यांनी सांगितले. सिग्नल यंत्रणा प्रभावित झाल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांना वाहतुकीचे नियंत्रण करावे लागले. २.५० च्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.ठाकुर्लीतून पूर्व-पश्चिम ये-जा करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीलाही त्याचा फटका बसला. रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी फाटकातून वाहने सोडण्याचे काम करत होते. या घटनेमुळे वाहनचालकांनी फाटक ओलांडण्याऐवजी डोंबिवलीतील मुख्य उड्डाणपुलाचा वापर करावा, अशी सूचनाही दक्ष नागरिकांनी केली. दरम्यान, सायंकाळपर्यंत तुटलेल्या फाटकाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. विविध ठिकाणच्या रेल्वे फाटकांमुळे दररोज मध्य रेल्वेच्या वाहतुकीला ४४ मिनिटांचा विलंब होतो. त्याला ठाकुर्ली, दिवा येथील फटकही कारणीभूत आहेत. ठाकुर्लीतील कोंडी फोडण्यासाठी केडीएमसीने तेथे उड्डाण पुलाचे काम सुरू केले आहे. मात्र, ते कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.