शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

जिल्ह्यातील युवकांना एनडीआरएफचे प्रशिक्षण, नेहरू युवक केंद्राचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 1:33 AM

युवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन एनडीआरएफसोबत मदतकार्य करण्याची संधी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील १८ ते २८ वयोगटांतील प्रत्येक तालुक्यातील ३० युवक व युवतींना खास प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे : युवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन एनडीआरएफसोबत मदतकार्य करण्याची संधी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील १८ ते २८ वयोगटांतील प्रत्येक तालुक्यातील ३० युवक व युवतींना खास प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे प्रशिक्षण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) अंतर्गत नेहरू युवा केंद्र ठाणे, यूएनडीपी, यूएनव्ही इंडिया यांच्या सहकार्याने दिले जाणार आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत असून इच्छुक युवकांनी वेळीच संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.देशात नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती निर्माण होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अचानक येणाऱ्या नैसर्गिक संकटांचा मुकाबला करण्यासाठी सुरुवातीला स्थानिकांना हिमतीने सज्ज राहावे लागते. या नागरिकांचे मनोबल वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवर व्यवस्थापनाची गरज निर्माण होत आहे.दरवर्षी सातत्याने येणाºया आपत्तीचा सामना करण्यासाठी, अकस्मात येणाºया आपत्तींना तोंड देण्यासाठी, अज्ञान तसेच माहितीचा अभाव यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी, कमीतकमी जीवित व वित्तहानी होईल, याची खात्री करण्यासाठी, आपत्तीला सहज बळी पडणाºया वर्गाचे रक्षण करण्यासाठी आता युवकांना स्थानिक पातळीवर हे प्रशिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.निवडीसाठी हे असणार पात्रता निकषकोणत्याही आपत्तीच्या वेळी पहिल्यांदा प्रतिसाद म्हणून काम करू इच्छिणाºया ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून ३० युवकयुवतींची या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात येणार आहे. ३१ आॅगस्ट रोजी ज्यांचे वय १८ ते २८ वर्षे आहे, अशा युवकांसाठी हे प्रशिक्षण आहे. प्रशिक्षणार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरु स्त असला पाहिजे. किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सहा दिवसांचे प्रशिक्षण घेऊन भविष्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच नेहरू युवा केंद्र कार्यालयासोबत काम करू इच्छिणाºया युवकांनी या प्रशिक्षणवर्गासाठी नोंदणी करण्याचे आवाहन युनायटेड नेशन स्वयंसेवक तथा जिल्हा युवा समन्वयक यांनी केले आहे. यासाठी इच्छुकांनी १५ आॅगस्टपर्यंत ठाणे येथील नेहरू युवा केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :National Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलthaneठाणे