- सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील हजारो व्यापाऱ्यांकडे वस्तू व सेवाकरापोटी (जीएसटी) दोन हजार ३४५ कोटी रुपये जीएसटीची रक्कम थकीत आहे. या विवादित व अविवादित रकमेचा व्यापाऱ्यांनी सरकारकडे त्वरित भरणा करणे अपेक्षित आहे. यासाठी राज्य शासनाने नुकताच सेटलमेंट (तडजोड) कायदा लागू केला आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील सर्व व्यापाºयांना जीएसटीसह व्याज व दंडाची रक्कम भरण्याची संधी प्राप्त झाली आहे. जूनअखेरपर्यंत भरणा केल्यास सवलतीचा लाभ मिळणे शक्य आहे.
‘जिल्ह्यात जीएसटीची दोन हजार २४५ कोटींची थकबाकी’ या मथळ्याखाली लोकमतने १९ मे रोजी वृत्त प्रसिद्ध करून हा विषय ऐरणीवर आणला. त्याची दखल जीएसटीचे ठाणे विभाग सहआयुक्त विकास कुलकर्णी यांनी घेऊन ‘तडजोड’ कायद्याखाली जिल्ह्यातील जीएसटी भरण्यास टाळाटाळ करणाºया विवादित व अविवादित व्यापाºयांना त्यांचा जीएसटी, व्याज व दंड ३० जूनच्या पहिल्या टप्प्यात भरण्याची संधी दिली आहे. या थकीत रकमेचा भरणा करून आॅनलाइन अर्ज केल्यास व्यापाºयांना मोठा लाभ मिळणार आहे. एवढेच नव्हे तर या रकमेच्या वसुलीबाबतही सुटका मिळणे शक्य असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात थकीत असलेल्या दोन हजार ३४५ कोटींच्या जीएसटीच्या रकमेमधील दोन हजार ६५ कोटी रुपये विवादित म्हणजे अपिलात गेलेल्या व्यापाºयांकडे थकीत आहे. तर, जीएसटीच्या थकीत रकमेतील २८० कोटी रुपये समोरून येऊन भरणारे म्हणजे अविवादित व्यापाºयांकडे थकीत आहे. या विवादित व अविवादित व्यापाºयांनी जूनअखेरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात थकीत रक्कम भरल्यास मोठी सवलत मिळणे शक्य आहे. अन्यथा, १ ते ३० जुलै या दुसºया टप्प्यातील कालावधीत थकीत रक्कम करून आॅनलाइन अर्ज केल्यास मिळणारी सवलत ही पहिल्या टप्प्यापेक्षा कमी मिळणार आहे. यावर मात करण्यासाठी ३० जूनच्या आतच थकीत रकमेचा भरणा करणे आवश्यक असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.उर्वरित जीएसटीमाफीची सवलतव्यापाºयांचा प्रलंबित जीएसटीकर, व्याज व दंड तसेच प्रलंबित लेट फी या ठरावीक रकमेचा भरणा केल्यास ‘तडजोड’ कायद्यांतर्गत उर्वरित रक्कम माफ करून घेण्याची संधी व्यापाºयांना प्राप्त झाली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी व्यापाºयांनी जीएसटीच्या mahagst.gov.in या वेबसाइटमधील ‘व्हॉट न्यू’वर जाऊन ‘तडजोड’कायद्याची सविस्तर माहिती घेता येईल. आवश्यक थकीत रकमेचा भरणा केल्यानंतर व्यापाºयांना आॅनलाइन अर्ज करण्याची पद्धतही या वेबसाइटवर उपलब्ध करून दिल्याचे कुलकर्णी यांनी निदर्शनात आणून दिले.