- नितीन पंडितभिवंडी : भिवंडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. तेथील गृहपाल आर.एस.गोन्नाडे यांच्याकडून विद्यार्थ्यांची हेटाळणी होत होती. विद्यार्थ्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्हा समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. या सर्वांची दखल घेत समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बलभीम शिंदे यांनी गोन्नाडे यांची बदली केली आहे.आलेल्या तक्रारींनंतर जिल्हा समाजकल्याण विभागाने गोन्नाडे यांना चांगलेच धारेवर धरले होते. अखेर गोन्नाडे यांच्याकडे अतिरिक्त असलेला भिवंडीतील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील अतिरिक्त गृहपालपदाचा पदभार बुधवारी काढून घेतला. त्यांच्याऐवजी कल्याण येथील मागासवर्गीय मुलांच्या ( गुणवंत ) वसतिगृहाचे गृहपाल एस. एन. सातरले यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवला आहे.वसतिगृहात आठवी ते एमएस्सी तसेच एलएलबीचे शिक्षण घेणारे ३५ विद्यार्थी राहत असून वसतिगृहत सुविधांचा बोजवारा उडाला असल्याने अनेक विद्यार्थी हे वसतिगृह सोडून निघून गेले आहेत. त्यामुळे सध्या या वसतिगृहात १५ ते १७ विद्यार्थी राहत आहेत . विशेष म्हणजे या वसतिगृहात राहणारे विद्यार्थी हे नांदेड, लातूर , सोलापूर, जळगाव, पुणे, जुन्नर ,चंद्रपूर, भुसावळ, चाळीसगाव अशा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आली आहेत. कमी विद्यार्थी असूनही या विद्यार्थ्यांना गृहपालांकडून सडलेली फळे, जास्त पाणी टाकलेले दूध, निकृष्ट जेवण देण्यात येत असल्याचा आरोप येथील विद्यार्थ्यांनी वेळोवेळी केला आहे. या संदर्भात गोन्नाडे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी वारंवार तक्र ारी केल्या होत्या.नियमांप्रमाणे मिळणार सुविधायापुढे सरकारी नियमांप्रमाणेच आम्हाला जेवण व इतर सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन आम्हाला समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी प्रतिक्रि या विद्यार्थी इम्रान रेहमान मोमीन याने दिली आहे .
डॉ. आंबेडकर वसतिगृहातील गृहपालांची बदली , विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 1:02 AM