ठाणे महापालिका आयुक्तांची बदली करा; कॉंग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 05:03 PM2022-02-07T17:03:05+5:302022-02-07T17:03:43+5:30

सत्ताधारी शिवसेनेने  आपल्या सोयीची प्रभार रचना केली असून यामध्ये पालिका प्रशासन देखील सामील असल्याचे आरोप काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.

Transfer Thane Municipal Commissioner; Congress demands after Ward restructure | ठाणे महापालिका आयुक्तांची बदली करा; कॉंग्रेसची मागणी

ठाणे महापालिका आयुक्तांची बदली करा; कॉंग्रेसची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे  : ठाणे  महापालिकेच्या प्रभाग रचनेनवरुन उलट सुलट चर्चा सुरु असतांनाच ठाणे शहर कॉंग्रेसनेही देखील यावर गंभीर आक्षेप घेतला आहे. सत्ताधारी शिवसेनेने  आपल्या सोयीची प्रभार रचना केली असून यामध्ये पालिका प्रशासन देखील सामील असल्याचे आरोप काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. प्रभाग रचनेच्या नकाशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून यासाठी यापुढेही अशा प्रकारचे फेरफार होण्याची शक्यता असल्याने पालिका आयुक्तांची बदली करून या ठिकाणी स्थानिक प्रशासनाला अधिकार न देता निवडणूक आयोगाने स्वतंत्न आयएएस अधिका:याची नेमणूक करावी अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

  प्रभाग रचनेवर गंभीर आरोप करण्यात आले असून यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे हरकती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले. चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार ज्या ज्या ठिकाणी लोकसंख्येनुसार एससी वॉर्ड पडणार आहेत अशा ठिकाणी एससी वॉर्ड पडू नये अशी पप्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. प्रभाग रचना झिगझॅग करून गोलाकार करणे अपेक्षित असताना प्रभाग रचनेची पूर्णपणे मोडतोड तयार करण्यात आली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक निवडणून येण्यासाठी तसेच सत्ता टिकवण्यासाठी नकाशामध्ये फेरफार करण्यात आले असून हा सर्व प्रकार पालिका आयुक्तांच्या देखरेकेखाली तसेच स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून झाला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. यापुढेही मतदार याद्यांमध्ये घोळ होण्याची शक्यता असून  यासाठी पालिका आयुक्तांचीच बदली करून या ठिकाणी निवडणूक आयोगाने स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. २० प्रभागांची तोडमोड करण्यात आली असून या प्रभागांच्या रचनेवर आक्षेप असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 
  
तर भाजपचे काम करू 
काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर आघाडीचे संकेत देण्यात आले असले तरी आघडी करायची कि नाही याबाबत स्थानिक नेतृत्वावर सोडले असल्याने  सन्मानपूर्वक जागा देण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे. यासाठी आघडीत २५ ते ३० टक्के जागांची मागणी करण्यात आली असून पालिकेच्या महत्वाच्या समित्यांवर वर्णी लावण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. जर कॉग्रेसला सन्मानपूर्वक जागा देण्यात आल्या नाहीत तर भाजपचे काम करायला देखील कमी करणार नाही असा अजब इशारा देखील त्यांनी दिला. 

सेनेच्या नगरसेवकांवरही निशाणा
काँग्रेस ३३ पॅनलमध्ये आपले उमेदवार उभे करणारा असून यामध्ये एसीसी आणि एन.टी उमेदवारांची यादी देखील तयार करण्यात आली आहे. एससीच्या जागा निर्माण होऊ नये यासाठी प्रभाग रचनेची खेळी करण्यात आली असली तरी एससीचे उमेदवार शोधण्यासाठी इतर पक्षांची मात्र चांगलीच धावपळ होणार आहे. यावेळी त्यांनी सेनेच्या नगरसेवकांवर देखील निशाणा साधला आहे. सेनेच्या नगरसेवकांचे कर्तृत्व शून्य आहे अशांना तिकीट न देता त्या जागा आम्हाला द्या अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

Web Title: Transfer Thane Municipal Commissioner; Congress demands after Ward restructure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.