शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

ट्रान्सफॉर्मर चोरणारी दुक्कल अटकेत

By admin | Published: May 06, 2017 5:50 AM

शहापूर आणि भिवंडी या ग्रामीण भागांत ट्रान्सफॉर्मर चोरून नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या एका दुकलीच्या मुसक्या ठाणे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील शहापूर आणि भिवंडी या ग्रामीण भागांत ट्रान्सफॉर्मर चोरून नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या एका दुकलीच्या मुसक्या ठाणे ग्रामीण पोलिसांनी आवळल्या आहेत. तर, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार असून त्याने महावितरणमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम केल्याने त्या दोघांना हाताशी घेऊन चोरीचे सत्र सुरू केल्याचे तपासात पुढे आले आहे. या दुकलीने शहापूर आणि पडघा परिसरांत ९ ट्रान्सफॉर्मरची चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून सुमारे साडेचार लाखांचा ऐवज हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले.शहापूर व भिवंडी उपविभागांमध्ये ट्रान्सफॉर्मरचोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. चोरीच्या घटनेनंतर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यापर्यंत शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. याचदरम्यान, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी अशा गुन्ह्यांना वेळीच आळा बसवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांना आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या शहापूर युनिटने मिळालेल्या माहितीनुसार, सतीश गोरखणे, रा. अघई आणि निलेश मलावकर, रा. कोशिंबिळे, शहापूर या दोघांना अटक केली. चौकशीत या गुन्ह्यांची कबुली देताना ट्रान्सफॉर्मर चोरण्यास फेब्रुवारी २०१७ पासून सुरुवात केली होती. यामधून तांबे मिळवण्यासाठी त्यातील वायर नदीकिनारी जाळत असत. तसेच ते दोघे कमी शिकले असून सध्या बेकार होते. त्यातच मुख्य आरोपीने काही महिन्यांपूर्वी महावितरणमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम केल्याने त्याला काही ज्ञान होते. त्याने या दोघांना मदतीला घेऊन चोरी करण्यास सुरुवात केली. ही कामगिरी आंधळे यांच्या पथकाने पार पाडली.सतीश आणि निलेश यांच्या तीन मोटारसायकली, ट्रान्सफॉर्मर खोलण्यासाठीचे साहित्य आणि ३६५ किलोग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तारा असा एकूण ४ लाख ३५ हजार ३१० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. चोरी केलेल्या तांब्याची तार विकण्याच्या तयारीत ते होते. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी दिली.